Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Cyber Crime : पोलीस अधिकारी असल्याचे भासवत फसवणूक; २ कोटी १८ लाखांचा लावला चुना, सायबर पोलीसात गुन्हा

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक करण्याचे वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. अशाच प्रकारे नवी मुंबईत एकाला पोलीस अधिकारी असल्याचे भासविले. तसेच बँक खात्यातून मणी लॉन्डरिंग झाल्याचे सांगत तब्ब्ल २ कोटी १८ लाख रुपयात फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  

नवी मुंबईत (Navi Mumbai) घडलेल्या या प्रकारात पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तुमचे बेकायदेशीर पार्सल पकडले आहे. तसेच तुमच्या बँक खात्यातुन मनी लॉडरिंग झाल्याचे सांगत आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक करण्यासाठी आरोपीनी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (Cyber Crime) आणि सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया यांचे बनावट लेटर हेडचा वापर केला आहे. हे लेटर हेड पाठवुन फिर्यादींच्या खात्यावरील रक्कम सर्व्हेलंस करीता वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सांगितले. 

सायबर पोलिसात गुन्हा दाखल 

बँक खात्यात रक्कम भरण्यास सांगुन तब्बल दोन कोटी अठरा लाख रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambernath Crime: मुलीचा करत नव्हती नीट सांभाळ, पतीने रागाच्या भरात पत्नीची गळा चिरून केली हत्या

Pre Wedding शूटसाठी खास लोकेशन, सास-बहू मंदिराला भेट द्याच

Maharashtra News Live Updates: समीर वानखेडे विधानसभेला लढणार नाहीत, त्या फक्त अफवाच

Maharashtra Navnirman Sena : मनसे अॅक्शन मोडवर; ठाण्यातून उमेदवारी देणार

IND vs NZ 1st Test: फुल ऑन राडा! मोहम्मद सिराज LIVE सामन्यात कॉनव्हेला भिडला- VIDEO

SCROLL FOR NEXT