Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

Sambhajinagar News : माहेरून ५ लाख आणण्यासाठी तगादा; त्रासाला कंटाळून गर्भवती महिलेने संपविले जीवन, तीन जण ताब्यात

Sambhajinagar News : संसाराला सुरवात झाल्यानंतर साधना नरवडे हिच्याकडे सासरची मंडळी सातत्याने तगादा लावत होते. गाडी घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणायला लावत होते
Published on

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींकडून वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आण; असा तगादा विवाहितेकडे लावण्यात आला होता. पैशांची सातत्याने मागणी करत दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून साडेचार महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेने गळफास घेत जीवन संपविले आहे. 

छत्रपती संभाजीनगरातील (Sambhajinagar) बिडकी परिसरात सदरची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत साधना किरण नरवडे (वय २५) असं या  मृत विवाहित महिलेचे नाव आहे. लग्न झाल्यानंतर संसाराला सुरवात झाल्यानंतर साधना नरवडे हिच्याकडे सासरची मंडळी सातत्याने तगादा लावत होते. गाडी घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणायला लावत होते. यासाठी होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाच्या त्रासाला कंटाळून साधनाने टोकाचे पाऊल उचलले. साधना हि साडेचार महिन्याची गर्भवती होती. तिने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Sambhajinagar News
Washim ZP : जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम; विनापरवानगी झेडपी आवारात दिसल्यास होणार कारवाई

५ जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान या प्रकरणी साधनांच्या पतीसह सासरच्या ५ जणांवर बिडकीन (Police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पती, सासू आणि सासरा या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल. या प्रकरणी तपास पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com