नाशिक : मुंबईतील वरळीत काही दिवसांपूर्वी हिट अँड रनची घटना घडली. या घटनेत वरळीतील एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी बेदरकारपणे कार चालवणाऱ्याला अटक केली आहे. मुंबईनंतर आता नाशिकमधूनही हिट अँड रनची घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या हिट अँड रन प्रकरणामुळे रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिकमध्ये बेदरकारपणे गाडी चालवून चालकाने एका महिलेला उडवल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताच्या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईनंतर नाशिकमध्येही हिट अँड रनची घटना घडली आहे. मंगळवारी ६ वाजता नाशिकच्या बारदान फाटा परिसरात ही घटना घडली. बेदकारपणे गाडी चालवणाऱ्या कारचालकाला अटक केली आहे. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत गंगापूर पोलिसांनी कारचालकाला राहत्या घरातून अटक केली आहे. देवचंद तिदमे असं आरोपीचं नाव आहे. गंगापूर पोलिसांनी तिदमे विरोधात हिट अँड रन कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
देवचंद तिदमे याने अपघातावेळी मद्यप्राशन केल्याचं वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झालं आहे. दारुच्या नशेत तिदमेने जाणीपूर्वक महिलेला धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी ६ वाजता घडलेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. अर्चना शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
यवतमाळच्या आर्णीजवळील नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील दत्तारापूरजवळ उस्मानाबादवरून नागपूरकडे कोथिंबीर घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. या भीषण अपघातात वाहनातील कोथिंबीर पूर्ण रस्त्यावर फेकली गेली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातानंतर महामार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.