Nashik Farmer issue  Saam tv
महाराष्ट्र

Nashik Farmer : बायकोचे दागिने गहाण ठेवून कांदा पिकवला, पण भावच मिळाला नाही; रडत रडत शेतकऱ्याने घेतली मोठी शपथ

Nashik onion Farmer News : बायकोचे दागिणे गहाण ठेवून नाशिकच्या सिन्नरमधील शेतकऱ्याने कांदा पिकवला. पण या कांद्याला भावच मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्याने रडत रडत कांदा पिकवणार नसल्याचे जाहीर केलं.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रडवण्यास सुरुवात केली आहे. शेतात पिकवलेल्या कांद्याला योग्य भावच मिळाला नाही. त्यानंतर शेतात पुन्हा कांदा पिकवणार नाही, अशी शपथ घेत नाशिकच्या सिन्नर येथील कांदा उत्पादक शेतकाऱ्याने टाहो फोडला.

बाजारात कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्याला रडू कोसळलं. या शेतकऱ्याने बायकोचे दागिने गहाण ठेवून कांदा पीक घेतलं. मात्र, कांद्याला भावच मिळत नसेल तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार तरी कसा, असा आर्त सवाल सिन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पांडुरंग चेवले यांनी केला.

नेमकं काय घडलं?

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटांमुळे कांद्याचे होणारे नुकसान आणि बे भरवशाच्या बाजारभावामुळे आता पुन्हा कांदा पिकवणार नाही, असा टाहो नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फोडलाय. सिन्नर तालुक्यातील जळगावचे शेतकरी पांडुरंग चेवले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असं त्यांचं कुटुंब आहे.

गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ते दोन एकरवर कांद्याची शेती करतात. मात्र मागील चार वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक संकटांमुळे होणारे नुकसान, कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव आणि निर्यातबंदीची कुऱ्हाड यामुळे हातात चार पैसे शिल्लक राहण्याऐवजी पांडुरंग चेवले यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय.

डोक्यावर असलेलं सहा लाखांचं कर्ज आता बारा लाखांपर्यंत पोहचलय. मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण कठीण झालेलं. तरीही यंदा पुन्हा कांदा पिकवण्यासाठी पत्नीचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यांनी १ लाख १० हजार रुपयांचं कर्ज काढलय. मात्र अवकाळी पाऊस आणि वातावरणातल्या बदलामुळे कांद्याची वाढ खुंटलीय. त्यात बाजार भाव देखील पडल्याने पांडुरंग चेवले हवालदिल झालेत.

कारण कांदा लागवडीसाठी आलेला खर्च, आता कांदा काढणी आणि वाहतूक खर्च पाहता बाजारात कांद्याला मिळणाऱ्या भावात उत्पादन खर्च देखील निघणार नसल्याने पुन्हा कांदा न पिकवण्याच्या निर्णयापर्यंत ते आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT