Rajasthan Farmer: आधी आत्महत्या करण्यापासून रोखलं; नंतर पाठवली दहा लाखांची नोटीस, राजस्थानच्या शेतकऱ्याबरोबर नेमकं काय घडलं?

Rajasthani Farmer Case: जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने राजस्थानमधल्या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याआधीच पोलिसांनी त्याचा जीव वाचवला.
Farmer
FarmerPTI
Published On

राजस्थानमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहनाचा प्रयत्न सुरु असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याचा जीव वाचवला. काही दिवसांनी शासनाद्वारे त्याला एक नोटीस पाठवण्यात आली. त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात शासनाला १० लाख रुपयांच्या आसपास खर्च आला असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. ही घटना राजस्थानमधील झुंझुनू या परिसरात घटलेली आहे.

विद्याधर यादव हा शेतकरी त्याच्या कुटुंबासह राजस्थानच्या झुंझुनूमध्ये वास्तव्याला आहे. त्या परिसरामध्ये विद्याधरची जमीन देखील आहे. काही काळापूर्वी तेथे सिमेंटचा कारखाना बांधण्यात आला. सिमेंट कारखाना ज्या ठिकाणी आहे, तेथे विद्याधरची जमीन होती. कारखाना उभारताना त्याला जमिनीच्या मोबदल्यात पैसे देण्यात आले. पण जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला नसल्याचा आरोप विद्याधरने केला. या संदर्भात त्याने जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती.

Farmer
Crime News : शहापूर हादरलं! महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर गोळीबार, एकाचा मृत्यू

जमिनीचे पैसे न मिळाल्याने विद्याधर त्रस्त होता. तक्रार करुनही कोणीही उत्तर देत नसल्याने तो थकून गेला होता. पुढे वैतागून त्याने प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामृत्यू करण्याची मागणी केली. दरम्यान ११ डिसेंबर रोजी तो सिमेंट कारखान्याजवळ पोहोचला. तेथे विद्याधरने जमिनीचा मोबदला न मिळाल्याने कुटुंबासह आत्मदहन करुन जीव देणार असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती मिळाल्यावर ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विद्याधरला ताब्यात घेतले.

विद्याधरचे प्रकरण कोर्टापर्यंत गेले. कोर्टाने संपूर्ण प्रकरण समजून घेतले आणि त्याचा जामीन मंजूर करत घरी जायची परवानगी दिली. लगेचच दुसऱ्या दिवशी विद्याधरला तीन कोटी रुपये मोबदल्याच्या स्वरुपात मिळाले.

Farmer
Fraud News : मराठी चित्रपट निर्मात्याला 30 लाख रुपयांचा गंडा, वाचा साविस्तर

दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करताना विद्याधरने शांती भंग केली. यावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी घटनास्थळी एक पोलीस अधीक्षक, दोन पोलीस उपअधीक्षक यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय अनेक पोलीस वाहनांनाही तेथे तैनात करण्यात आले होते. यात सरकारचे ९ लाख ९९ हजार ५७७ रुपये खर्च झाले. या खर्चाची परफेड करण्यासाठी शासनाने विद्याधर यादवला नोटीस पाठवली.

Farmer
Dombivli Crime : संतापजनक! ४ वर्षीय मुलीचा विनयभंग; कोपरमधील घटनेनं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com