Dombivli Crime : संतापजनक! ४ वर्षीय मुलीचा विनयभंग; कोपरमधील घटनेनं खळबळ

kalyan Crime News : कोपर परीसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी आरोपी चंद्रकांत हिवाळे ला विष्णू नगर पोलीसानी बेड्या ठोकल्या आहेत.
dombivli kopar Crime News
dombivli kopar Crime News
Published On

dombivli kopar Crime News : रायगडमध्ये ८० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचाराची घृणास्पद घटना ताजी असतानाच, डोंबिवलीजवळील कोपरमध्ये अत्यंत संतापजनक प्रकार उघड झाला आहे. कोपर परिसरातील चार वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. या घटनेनं कोपरमध्ये खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीजवळील कोपरमध्ये ४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघड झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विष्णू नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पीडित मुलगी ही दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत होती. त्याचवेळी ४५ वर्षीय व्यक्तीने तिचा विनयभंग केला. आरोपीला अटक केली आहे. तो वाहनचालकाचं काम करतो. या घटनेचा तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.

डोंबिवली परिसरातील कोपर येथे घडलेल्या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येतोय . घरासमोरील ओट्यावर खेळणाऱ्या चार वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली .याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली .या तक्रारीनुसार पोलिसांनी चंद्रकांत हिवाळे या नराधमाला अटक केली आहे याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

पीडित चार वर्षाची मुलगी डोंबिवली जवळील कोपर परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. दोन दिवसांपूर्वी ही पीडित मुलगी घरासमोरील ओट्यावर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या चंद्रकांत हिवाळे हा तिला जवळ घेऊन या मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केले या घटनेमुळे मुलगी घाबरली तिने घरी घडलेल्या प्रकार सांगितला या प्रकरणी कुटुंबाने तत्काळ विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या तक्रारीनुसार विष्णू नगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी चंद्रकांत हिवाळे या नराधमाला बेडा ठोकल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com