Farmer Digital Card: शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट! आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार डिजिटल कार्ड? उपयोग काय? जाणून घ्या

Farmer Digital Card: सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आता स्वतः चे वेगळे ओळखपत्र मिळणार आहे.
Farmer ID Card
Farmer ID CardSaam Tv
Published On

भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेती करते. त्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. शेती अधिक विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील सर्व शेतकऱ्यांना खास ओळखपत्र देण्यात येणार आहे. यावर शेतकऱ्यांचा युनिक १२ अंकी नंबर देण्यात येणार आहे.

प्रत्येक शेतकऱ्याला डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार आहे. या कार्डचा फायदा काय होणार? यासाठी रजिस्ट्रशेन कुठं अन् कसं करायचं? हे जाणून घ्या.

शेतकऱ्यांसाठी डिजिटल आयडी

शेतकऱ्यांसाठी खास डिजिटल आयडी कार्ड बनवण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला हे ओळखपत्र देण्यात येणार आहे. या आयडीमुळे शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा घेता येणार आहे. या डिजिटल आयडीमुळे योजनांचा रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे. (Farmer Digital Card)

Farmer ID Card
Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

काय काम होणार?

पीएम किसान योजना, आरोग्य कार्ड या योजनांचा फायदा एका आयडीमधून घेता येणार आहे. या डिजिटल आयडी कार्डमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा डेटा तयार केला जातो. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

शेतकऱ्यांना मदत निधी उपलब्ध होण्यासाठी तसेच तुम्ही वेगवेगळ्या योजनांसाठी पात्र आहात की नाही हे कळणार आहे. त्यामुळे योग्य वेळी निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला जाणार आहे. (Farmer digital Card News)

भारतात सर्वात जास्त शेतकरी आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा डेटा एकत्रितपणे ठेवता येणार आहे. कृषी खात्यासह अनेक खात्यांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे कामात एकसूत्रता येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांची आकडेवारी, अनुदान, लाभ, सवलती, कृषी विमा योजना ही कामे राबवण्यासाठी डिजिटल आयडी उपयोगी होणार आहे.

या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांची ओळख पटणे सोपे होणार आहे. जमिनिचे सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर तुम्हाला मिळणार आहे. कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. तुमचे आयडी कार्ड डिजिटल असल्याने अॅपवर किंवा साइटवर सर्व माहिती सेव्ह होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कागदपत्रे घेऊन जाण्याची गरज आहे. तसेच हवामान खात्याचे अलर्टदेखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवता येणार आहे.

Farmer ID Card
Government Scheme: तरुणांना मिळणार ५० लाखांची मदत, महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती योजना नक्की आहे तरी काय?

मिडिया रिपोर्टनुसार, देशभरातली ११ कोटी शेतकऱ्यांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याविषयी कृषी विभागाने पत्रदेखील जारी केले आहे.

Farmer ID Card
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना पहिला धक्का; पुणे जिल्ह्यातील १० हजार अर्ज ठरले अपात्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com