Wife and Husband Clash : बायकोची विचित्र मागणी, जाचाला इंजिनीअर नवरा कंटाळला; व्हिडिओ रेकॉर्ड करून स्वत:ला संपवलं

Wife and Husband Clash in bangalore : नवरा आणि बायकोचे वाद टोकाला गेले. त्यानंतर बायकोच्या जाचाला कंटाळून इंजिनीअर नवऱ्याने जीवन संपवलं.
Wife and Husband
Wife and Husband Clash updateSaam tv
Published On

बेंगळुरूच्या एका प्रायव्हेट कंपनीत काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने आयु्ष्य संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी २४ पानी चिठ्ठी लिहून जीवन संपवलं. यावेळी या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पत्नीच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच तीन कोटी रुपयांची मागणी केल्याचाही आरोपींचा आरोप आहे.

अतुष सुभाष बेंगळुरु येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)मध्ये डीडीएम पदावर कार्यरत होते. बेंगळुरु पोलिसांनी सांगितलं की, ही घटना मंजूनाथ लेआऊट भागातील आहे. मराठाहल्ली पोलीस स्टेशन भागातील आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात समोर आलं की, अतुल सुभाष असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं कुटुंबात बिनसलं होतं. पत्नीने त्याच्या विरोधात उत्तर प्रदेशात गुन्हा नोंदवला होता.

Wife and Husband
Beed crime News : बीडमध्ये तणाव! सरपंच पती खून प्रकरणी ग्रामस्त आक्रमक, रास्ता रोको

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता कॉल आला. यावेळी एका आत्महत्या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर ३४ वर्षीय अतुल सुभाष हा बंद घरात मृत अवस्थेत आढळला. त्याने घरात आत्महत्या केली होती.

Wife and Husband
Akola Crime : शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनची चोरी; चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची माहिती व्यक्तीच्या उत्तर प्रदेशमधील कुटुंबाला सांगितली. त्यानंतर त्यांचा भाऊ विकास कुमार घटनास्थळी पोहोचला. विकास कुमार यांनी सांगितलं की, अतुल यांची पत्नी, तिची आई आणि तिचा भाऊ आणि तिच्या काकाने खोट्या आरोपांमध्ये फसवलं. या प्रकरणात अतुलच्या पत्नीच्या कुटुंबीयांकडून तीन कोटींची मागणी केली होती. यामुळे अतुल सुभाष नैराश्यात होता. यामुळे त्याने जीवन संवपलं. पीडित कुटुंबीयाने या प्रकरणी पोलिासांत गुन्हा नोंदवला आहे.

Wife and Husband
Ratnagiri Crime: मामीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, धक्कादायक कारण उघड

पोलिसांनी काय सांगितलं?

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'त्याने अनेक लोकांना ईमेलद्वारे आत्महत्येपूर्वी चिठ्ठी पाठवली. त्याने एका व्हाट्सअॅप ग्रुपवरही चिठ्ठी शेअर केली. त्याने मेसेजमध्ये म्हटलं की,'सर, माझा मेसेज गुड बाय बोलण्यासाठी आहे. शक्य असेल तर माझ्या कुटुंबीयांना मदत करा. आतापर्यंत साथ दिली, त्यासाठी खूप खूप आभार'. यावेळी अतुल यांनी व्हिडिओ देखील पाठवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com