Beed crime News : बीडमध्ये तणाव! सरपंच पती खून प्रकरणी ग्रामस्त आक्रमक, रास्ता रोको

Beed Kej News : सरपंच पती संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे कारने मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगाव जवळ अज्ञातांनी गाडी अडवून कारची तोडफोड करत संतोष देखमुख यांचे अपहरण केले होते.
Kej crime News
Kej crime NewsSaam tv
Published On

बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु केला आहे. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी ६ पैकी दोघांना अटक केल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली.  

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे कारने मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगाव जवळ अज्ञातांनी गाडी अडवून कारची तोडफोड करत संतोष देखमुख यांचे अपहरण केले होते. दरम्यान यांच अपहरण करून काल खून करण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणाने बीड जिल्हा हादरला असून मस्साजोग येथील ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत. 

Kej crime News
Nandurbar Malnourished : नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचा आकडा वाढताच; १८ हजार कुपोषित बालके

ग्रामस्थांचा रास्ता रोको 

दरम्यान याप्रकरणी आता मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक होत आरोपींना तात्काळ अटक करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, ही मागणी घेऊन ग्रामस्थांनी बीड- अंबाजोगाई महामार्ग अडवत मस्साजोग येथे रास्ता रोको केला आहे. दरम्यान यामुळे बीड-अंबाजोगाई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान या प्रकरणाचा मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या प्रकरणाशी संबंध आहे. यातील आरोपींना पुढील ४८ तासात अटक करू; त्यामुळे ग्रामस्थांनी शांतता राखावी, असं आवाहन देखील यावेळी सचिन पांडकर यांनी केल आहे..

Kej crime News
Badlapur Cylinder Blast : बदलापूरमध्ये हातगाडीवरील सिलिंडरचा स्फोट; कचरा जाळताना झाला स्फोट, वॉचमन जखमी

तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा पथक स्थापन करण्यात आले आहे. धाराशिव बीडमध्ये पथकाकडून शोध सुरू आहे. या दरम्यान केज जवळील तांबवा गावातील शिवारातून जयराम माणिक चाटे (वय २१ रा.तांबवा ता. केज) व महेश सखाराम केदार (वय २१ रा. मैंदवाडी ता.धारुर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी, बीडच्या केज पोलीस ठाण्यात आरोपी सुदर्शन घुले रा.टाकळी ता. केज याच्यासह अन्य पाच आरोपींवर गुन्हा दाखल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com