Nandurbar Malnourished : नंदुरबार जिल्ह्यात कुपोषणाचा आकडा वाढताच; १८ हजार कुपोषित बालके

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने आढळून येत असलेल्या कुपोषित बालकांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मागील वर्षी विधान परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणावर चर्चा झाली होती. जिल्ह्यात त्यावेळी ३३ हजार कुपोषित बालक असल्याचा अहवाल समोर आला होता
Nandurbar Malnourished
Nandurbar MalnourishedSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्याने कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जातात. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतो. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण कमी होताना दिसून येत नाही. आजच्या घडीला देखील जिल्ह्यात तब्बल १८ हजार कुपोषित बालके आढळून आली आहेत. यामुळे जिल्ह्यातील कुपोषणाचा कलंक कधी पुसला जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने आढळून येत असलेल्या कुपोषित बालकांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मागील वर्षी विधान परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणावर चर्चा झाली होती. जिल्ह्यात त्यावेळी ३३ हजार कुपोषित बालक असल्याचा अहवाल समोर आला होता. यावर्षीही नंदुरबार जिल्ह्यात जवळपास १८ हजार कुपोषित बालके असल्याचे समोर आले आहे. अनेक परिवार रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने मार्च महिन्यात स्थलांतरित मजूर परत आल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषणाची आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nandurbar Malnourished
Indrayani River : मित्रांबरोबर पोहायला गेला परतलाच नाही, मित्रांच्या डोळ्यासमोर तो बुडाला पण...

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार जवळपास १८ हजार कुपोषित बालके नंदुरबार जिल्ह्यात असून त्यापैकी अति तीव्र कुपोषित अर्थात सॅम बालकांची संख्या २ हजार २२३ आहेत. तर मध्यम कुपोषित अर्थात मॅम बालकांची संख्या १५ हजार ७४४ इतकी आहे. जिल्ह्यातील २ हजार ५६३ अंगणवाडी मधील कुपोषित बालकांची आकडेवारी आहे. अति तीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यातील अक्कलकुवा, धडगाव, मोलगी आणि नंदुरबार या ठिकाणी पोषण आणि पुनर्वसन केंद्र असून या ठिकाणी बालकांवर उपचार आणि योग्य पोषण आहार दिला जाऊन उपचार केला जात असतो.  

Nandurbar Malnourished
Sambhajinagar Crime : दुचाकीचा धक्का लागल्याने वाद; टोळक्याकडून कुटुंबावर हल्ला, दोनजण जखमी 

जिल्ह्यातील पोषण आणि पुनर्वसन केंद्रांची संख्याही वाढवण्याची आवश्यकता असल्याचे वाढत्या कुपोषित बालकांच्या संख्येवरून समोर येत आहे. जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना असून आदिवासी विकास विभागाच्या मार्फत ही योजना राबविल्या जात असतात. मात्र कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करूनही कुपोषण कमी होत नसल्याने योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात का असा प्रश्न उपस्थित होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com