Jalgaon Bribe Case : १५ हजारांची लाच घेताना नगररचना सहाय्यक ताब्यात; भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच

Jalgaon News : जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने बांधकाम परवानगी व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण जळगाव महापालिकेत मंजुरीसाठी टाकले होते.
Jalgaon Bribe Case
Jalgaon Bribe Case Saam tv
Published On

जळगाव : नवीन घराचे बांधकाम परवानगी व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी जळगाव महापालिकेतील सहाय्यक नगररचनाकार लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव महापालिकेत नगररचना सहाय्यक असलेले मनोज समाधान वन्नेरे (वय ३४) असे अटकेतील अधिकाऱ्याचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने बांधकाम परवानगी व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण जळगाव महापालिकेत मंजुरीसाठी टाकले होते. त्यांनी महापालिकेत तीन प्रकरणे दाखल केली आहेत. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी २१ हजारांची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले, 

Jalgaon Bribe Case
Ambajogai News : औषध पुरवठा करणाऱ्या विशाल एंटरप्राइजेसवर बंदी; स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठातांची माहिती, सप्लाय करणाऱ्या कंपन्याही बनावट

तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि सहाय्यक नगररचना संचालक (अतिरिक्त कार्यभार) डिगेश तायडे यांना देण्यासाठी मागितले, अशी एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून पथकाने ९ डिसेंबरला दुपारी तीनला सापळा रचत १५ हजारांची लाच स्वीकारताना वन्नेरे यांना पकडले.

Jalgaon Bribe Case
Cotton Price : कापसाची निर्यात ठप्प; केवळ ३ लाख गाठींची खरेदी

तक्रारदार आणि नगररचना सहाय्यक मनोज वन्नेरे यांच्यात झालेल्या संभाषणाच्या क्लिपमध्ये आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना एका प्रकणात आठ हजार, तर सहाय्यक संचालक डिगेश तायडे यांना चार हजार आणि उरलेले माझे, असा हिशेब सांगून लाचेच्या रकमेचे दर सांगण्यात आल्याचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांनी सांगितले. सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पथकातील उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com