नाशिकमध्ये मृत समजलेल्या १९ वर्षीय तरुणाने अंत्यविधीच्या तयारीत अचानक हालचाल केली.
नातेवाईकांच्या ऐकण्यात झालेल्या गोंधळामुळे ‘ब्रेन डेड’ऐवजी मृत्यू झाल्याचा गैरसमज झाला.
तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तो ब्रेन डेड नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
Nashik News: नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये एक १९ वर्षीय तरुण अपघातामध्ये गंभीररित्या जखमी झाला होता. जखमी तरुणाच्या नातेवाईकांच्या ऐकण्यात गडबड झाली आणि त्यांना तरुणाचा मृत्यू झाला असे वाटले. अंत्यविधीची तयारी सुरु असताना तरुण अचानक हालचाल करु लागला. यामुळे एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यात १९ वर्षीय भाऊ लचके नावाच्या तरुण अपघातामध्ये जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेमध्ये नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने जखमी तरुणाला ब्रेन डेड म्हणून घोषिक केल्याचा दावा तरुणाच्या नातेवाईकांनी केला.
तरुणाच्या नातेवाईकांच्या ऐकण्यात गोंधळ झाला. त्यांचा 'ब्रेन डेड'च्या जागी 'डेड' असा गैरसमज झाला. तरुणाचा मृत्यू झाला असे समजून त्याला रुग्णालयातून अंत्यविधीसाठी घरी नेण्यात आले. अंत्यविधीची तयारी सुरु असताना हा तरुण अचानक हालचाल करु लागल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. नेमकं काय घडतंय हे लोकांना समजले नाही.
त्यानंतर जखमी तरुणाला पुन्हा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून चो ब्रेन डेड नसल्याचा खुलासा जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केल्याने या प्रकरणातला गुंता अधिकच वाढला आहे. तरुणाच्या नातेवाईकांच्या ऐकण्यात झालेल्या गोंधळामुळे हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात मेडिकल कॉलेज रुग्णालय प्रशासनाने मात्र वेगळीच माहिती दिली. जखमी तरुणाला त्याचे नातेवाईक खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जातो म्हणून घेऊन गेले असा खुलासा मेडिकल कॉलेज प्रशासनाने केला आहे. हा सगळा प्रकार गैरसमजातून नाही तर आणखी दुसऱ्या काही कारणांमुळे झाला असे म्हटले जात आहे. या प्रकरणाची चर्चा शहरभर पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.