Student Death : पहाटेपर्यंत अभ्यास केला, सकाळी मृतदेह मिळाला; M.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याचा परीक्षेपूर्वी मृत्यू

Student Death News : आयआयटी-बीएचयूमधील एमटेकच्या विद्यार्थ्याचा परीक्षेच्या दिवशी मृत्यू झाला. परीक्षेच्या आधी तो रात्रभर मित्रांसोबत अभ्यास करत होता. विद्यार्थ्याचा मृत्यू का झाला याचा तपास सुरु आहे.
Student Death
Student Deathx
Published On
Summary
  • आयआयटी-बीएचयूमधील एमटेक विद्यार्थी अनूप सिंह चौहान याचा परीक्षेपूर्वी मृत्यू झाला.

  • रात्रभर मित्रांसोबत अभ्यास केल्यानंतर सकाळी तो जागा झाला नाही.

  • रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले, या प्रकरणी तपास सुरू आहे.

Shocking : एमटेकमध्ये शिक्षणारा एक विद्यार्थी त्याच्या परीक्षासाठी अभ्यास करत होता. परीक्षेच्या आदल्या रात्री तो त्याच्या दोन मित्रांसह एका खोलीत पेपरची तयारी करत होता. तिघांनी पहाटे ३ वाजेपर्यंत अभ्यास केला. त्यानंतर ते तिघेही झोपी गेले. सकाळी सहाच्या सुमारास या तरुणाच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही. रुग्णालयात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीतील आयआयटी-बीएचयूमधील एमटेकचा विद्यार्थी अनूप सिंह चौहानचा बुधवारी (३ ऑगस्ट) परीक्षा होती. त्यासाठी तो मंगळवारी (२ ऑगस्ट) रात्रभर मित्रासोबत अभ्यास करत होता. तयारी केल्यानंतर तो झोपी गेला. सकाळी मित्रांनी अनूपला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो जागा झालाच नाही.

Student Death
Maharashtra Politics : ठाकरे गटाला बसणार मोठा झटका? अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा

अनूपचे शरीर थोडे गरम होते. मित्रांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण या गोष्टीचा काहीच परिणाम झाला नाही. अनूप उठत नसल्याचे समजल्यावर मित्रांनी ताबडतोब आयआयटी प्रशासनाला याची माहिती दिली. त्याला बीएचयूच्या सर सुंदर लाल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी अनूपला मृत घोषित केले. अनूपच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असावा असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.

Student Death
Politics : भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधी पक्षाने साथ सोडली, एनडीएमधूनही घेतली माघार

पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच अनूपच्या मृत्यूचे कारण समोर येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. पोस्टमोर्टम केल्यानंतर पोलिसांनी अनूपचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवला आहे. अनूप सिंह चौहान हा मूळचा आझमगडचा आहे, त्याचे वडील व्यवसायाने वकील आहे. अनूप घरातील थोरला मुलगा आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Student Death
Politics : मोठी राजकीय घडामोड! बड्या नेत्याने पक्षातून केली मुलीची हकालपट्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com