Politics : भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधी पक्षाने साथ सोडली, एनडीएमधूनही घेतली माघार

Political News : तामिळनाडूमध्ये भाजपला आणि एनडीएला मोठी धक्का बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी एएमएमके पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Politics BJP NDA
Politics BJP NDAX
Published On
Summary
  • तामिळनाडूमध्ये एएमएमके पक्षाने निवडणुकीआधी एनडीएपासून बाहेर पडण्याची घोषणा केली.

  • टीटीव्ही दिनकरन यांनी भाजपवर विश्वासघाताचा आरोप केला.

  • एएमएमके आता तामिळनाडूमधील राजकारणात स्वतंत्रपणे पुढे जाणार आहे.

Politics News : विधानसभा निवडणुकीच्या आधी तामिळनाडू राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. टीटीव्ही दिनकरन यांच्या नेतृत्त्वाखालील अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम म्हणजेच एएमएमके या पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील एनडीएपासून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) वेगळं होण्याची घोषणा केली आहे. भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप दिनकरन यांनी केला आहे. एएमएमके पक्ष आता एनडीएचाय भाग राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एएमएमकेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २ मतदारसंघात निवडणूक लढवली होती. पण त्यांना निवडणुकीत यश आले नव्हते.

एएमएमकेची स्थापना २०१८ मध्ये टीटीव्ही दिनकरन यांनी केली होती. ते याआधी अन्नाद्रमुक म्हणजेच एआयएडीएमकेचे नेते होते. अन्नाद्रमुक पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतंत्र्य पक्ष स्थापन केला. ते जयललिता यांचा वारसा पुढे नेत असल्याचा दावा करतात. तामिळनाडूतील लोकांच्या हक्कांसाठी लढणे आणि त्यांच्यासाठी आवाज उठवणे हे दिनकरन यांच्या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Politics BJP NDA
Maharashtra Politics : ठाकरे गटाला बसणार मोठा झटका? अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा

आमचा पक्ष एएमएमके काही लोकांच्या विश्वासघाताच्या विरुद्ध सुरु झाला होता. आम्हाला वाटले होते, कदाचित दिल्लीत बसलेले लोक ही गोष्ट बदलतील किंवा त्यांची जागा घेतली. पण असे काहीही झाले नाही, असे दिनकरन कुड्डालोर जिल्ह्यातील कट्टुमन्नारकोइल येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. 'दिल्लीतून सकारात्मक गोष्टी यायची आम्ही वाट पाहत होते. पण तसे काही झाला नाही. आता आम्ही डिसेंबरमध्ये पुढील रणनीती जाहीर करु', असेही दिनकरन यांनी सांगितले.

Politics BJP NDA
Politics : मोठी राजकीय घडामोड! बड्या नेत्याने पक्षातून केली मुलीची हकालपट्टी

तामिळनाडूमध्ये एनडीएमधून बाहेर पडणारा एएमएमके हा दुसरा पक्ष आहे. एआयएडीएमके नेते ओ. पनीरसेल्वम यांनीही एनडीएमधून आपला पक्ष बाहेर काढला होता. तामिळनाडूमध्ये एनडीएचे नेतृत्त्व एआयएडीएमके करत आहे. एप्रिल २०२५ मध्ये एआयएडीएमके पक्षाने भाजपशी युती केली होती. २०२३ मध्ये हे पक्ष काही काळासाठी वेगळे झाले होते. पण नंतर त्यांनी पुन्हा हातमिळवणी केली.

Politics BJP NDA
Beed : बीड पुन्हा हादरलं! शिक्षिकेवर १६ वर्षे अत्याचार, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com