Maharashtra Politics : ठाकरे गटाला बसणार मोठा झटका? अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा

Maharashtra Political News : पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शहराचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे अजित पवार गटात जाऊ शकतात अशा चर्चा रंगल्या आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On
Summary
  • पिंपरी-चिंचवडचे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे अजित पवार गटात जाण्याच्या चर्चेला उधाण.

  • गणेशोत्सवाच्या निमित्ताने पार्थ पवार आणि संजोग वाघेरे यांच्या भेटीमुळे चर्चांना आणखी वेग.

  • या हालचालींमुळे आगामी निवडणुकांआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असे संकेत पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्याआधी ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजय वाघेरे हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये सक्रीय झाले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते शहरातील अनेक गणेश मंडळांना भेटी देत आहेत. या माध्यमातून त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते, पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. शहरातील पकड अधिक मजबूत करण्यासाठी भेटीगाठी सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

Maharashtra Politics
Politics : मोठी राजकीय घडामोड! बड्या नेत्याने पक्षातून केली मुलीची हकालपट्टी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही सदिच्छा भेट असली, तरी या भेटीमुळे शहरात वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. सदिच्छा भेटीदरम्यान पार्थ पवार यांनी वाघेरे यांच्या घरी जेवण देखील केले. या भेटीमुळे एकूणच वाघेरे जुन्या पक्षात जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जर या चर्चा खऱ्या ठरल्या, तर ठाकरे गटाला पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसेल असे म्हटले जात आहे. पण सध्यातरी या फक्त चर्चाच आहेत, त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : ठाकरे गटाला झटका! बडा नेता हाती घेणार 'भाजप'चं कमळ

संजोग वाघेरे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेमधून लोकसभा निवडणूक मावळ येथून लढवली होती. त्यानंतर २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, तेव्हा त्यांनी ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये त्यांनी ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवली. संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटासाठी महत्त्वाचे नेते मानले जात आहेत.

Maharashtra Politics
Viral : आंदोलनाच्या नावाखाली गुंडगिरी! गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणारी गाडी भाजप कार्यकर्त्यांनी अडवली, Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com