
Megha Ghadge : मराठी अभिनेत्री मेघा घाडगेला पछाडलेला सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली. मागील अनेक वर्षांपासून ती मराठी सिनेसृष्टीत सक्रीय आहे. अभिनयासह नृत्यक्षेत्रामध्येही मेघा काम करत आहे. तिने अनेक डान्स शो देखील केले आहेत. एका घटनेमुळे मेघाच्या करियरवर परिणाम झाला. यामुळे काही काळापासून ती सिनेसृष्टीपासून दूर राहिली. या घटनेवर मेघा घाडगेची प्रतिक्रिया दिली आहे.
मेघाने एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ज्या घटनेमुळे तिच्या करियरवर नकारात्मक परिणाम झाला, त्या प्रसंगाबद्दल सांगितले. 'तेव्हा मी माझं घर घेतलं होतं. महेश टिळेकर यांच्यामुळे मला ते घर मिळालं होतं. फक्त मीच नाही, मराठी तारका या कार्यक्रमातील इतर काही अभिनेत्रींना, कलाकारांनाही त्यांच्यामुळे घर मिळालं होतं. घराचे हफ्ते कसे फेडणार वगैरे गोष्टीचं टेन्शन मला आलं होतं. पण घर घेतल्यावर वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या', असे मेघा म्हणाली.
'घर घेतल्यावर मी एका कोरियोग्राफरला आणि त्याच्या असिस्टंटला माझ्या घरात आश्रय दिला होता. तो कोरियोग्राफर मुलगा वयाने माझ्यापेक्षा खूप लहान होता. तेव्हा मी एका रिलेशनशिपमध्ये होते आणि याबद्दल मी कोणालाही सांगितलं नव्हतं. माझ्या घरातल्या मुलाविषयी आमच्या टीममधल्या एकाने अफवा पसरवली. इंग्रजीच्या एका शब्दावरुन माझ्या अफेयरची अफवा पसरली.'
मेघा घाडगे म्हणाली, 'आपल्या इंडस्ट्रीत दोन अभिनेत्री अशा आहेत. ज्या गॉसिप क्वीन असतात ना, तशा... त्या दोघी त्या ग्रुपमध्ये होत्या. माझ्या टीममधल्या व्यक्तीने किस्सा सांगितला तेव्हा मेसेज वाचल्यानंतर त्या दोघी इतकं बोलायला लागल्या, त्या ग्रुपवर त्यांच्याशी काहीच संबंध नाही. तिला मारा, तिचे कपडेच काढा, तो मुलगा वेगळ्याच झोनमध्ये आहे वगैरे काहीतरी. या घटनेमुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेले. या सगळ्याचा माझ्या करियरवर परिणाम झाला. त्या दोघींना मी कानाखाली मारुन जाब का नाही विचारला असं मला वाटतंय.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.