share market  saam tv
महाराष्ट्र

Shocking : बाजार घसरला अन् १६ लाखांचा फटका बसला; नैराश्यात नाशिकमधील तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Nashik Shocking : शेअर बाजाराच्या घसरणीने तरुणानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक इथं घडलाय. बाजारात झालेल्या नुकसानीमुळे 30 वर्षीय तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलंय. पाहूया रिपोर्ट

Saam Tv

नाव - रवींद्र कोल्हे

वय - 30 वर्ष

राहणार - नाशिक

शेअर बाजारात या तरूणाचं 16 लाख रुपयांचं नुकसान झालं… उधारीवर आणलेले काही लाख आणि घरच्यांच्या मेहनतीचा सर्वंच पैसा बुडाला… आज ना उद्या बाजार सावरेल या आशेवर रवींद्र होता. पगार आला की बाजारात गुंतवणूक करणं आणि मोठी स्वप्न पाहणं त्याचं नित्याचं होतं… मात्र शुक्रवारी बाजार 1400 अंकांनी घसरला आणि रवींद्रनं कच खाल्ली. त्यातूनचं त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं…

भारतीय शेअर बाजारात गेल्या 5 महिन्यांपासून घसरणीचा ट्रेंड आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्यांसह छोट्या गुंतवणुकदारांनी आपल्या मेहनतीचे पैसे गमावलेत. बाजारातील या घसरणीच्या ट्रेंडवर अनेक जण गुंतवणूकदारांना पैसे गुंतवताना काळजी घेण्याचा सल्ला देतायत. सेन्सेक्स आणि निफ्टीत अनुक्रमे 13.23% आणि 14.19% इतकी घसरण झालीय. अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स 40 टक्क्यांपर्यंत घसरलेत. याचा सर्वाधिक फटका लहान गुंतवणूकदारांना बसलाय.

शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळे नैराश्य आलेल्या 30 वर्षीय रवींद्रनं अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतलं. 90 टक्के भाजल्यानं त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेअर बाजारानं घेतलेला हा पहिला बळी… मात्र इतकं टोकाचं पाऊल टाकू नका... घरच्यांची तुमच्यावर काही दशकांची गुंतवणूक आहे. त्यांना पोरकं करू नका हेच आवाहन आम्ही तुम्हाला करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT