Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

Ajit Pawar Group- Sharad Pawar Alliance: महापालिकेसाठी एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादीनं वेळ साधलीय. निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या राष्ट्रवादी निवडणुकीनंतरही कायम सोबत राहण्याची चर्चा रंगलीय. त्याचं नेमकं कारण काय? दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबद्दल अजित पवारांनी नेमके काय सूचक संकेत दिलेत. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Ajit Pawar Group- Sharad Pawar Alliance
AJIT PAWAR AND SUPRIYA SULE COME TOGETHER, BIG HINTS OF LONG-TERM NCP UNITYsaam tv
Published On
Summary
  • पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

  • अजित पवार आणि सुप्रिया सुळे मंचावर एकत्र दिसल्याने चर्चा रंगली

  • जाहीरनाम्यातून मजबूत राजकीय संदेश

अखेर अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकीय मंचावर एकत्र येण्याची वेळ जुळून आलीच. आणि त्याला कारण ठरलंय पुणे महापालिकेसाठी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रसिद्ध केलेली अष्टावधानी नेतृत्वाची अष्टसुत्री. मात्र हा जाहीरनामा प्रकाशित करताना सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं ते अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांच्या मध्ये असलेल्या घड्याळानं.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात.. महापालिका निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधलेल्या दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र प्रचाराचा धडाकाही सुरु केलाय. त्यात आता अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या मध्ये घड्याळ ठेवल्यानं राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा नव्यानं रंगली. तर अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनीही या राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत सूचक संकेत दिलेत.

खरं तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह घड्याळावरच दावा केला. पक्ष आणि चिन्हाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीकेच्या फैरी झाडल्या.. पुढे घड्याळ्याची वेळ बदलत गेली आणि एकमेकांवर टोकाची टीका करणारे नेते आधी नगरपालिका आणि आता महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले. हिच एकी निवडणुकीनंतरही कायम राहणार का? की पुन्हा वेगवेगळ्या मार्गांनी राजकीय लढाई लढणार. याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com