
पालघरच्या एका महसूल विभागाच्या अधिकाऱ्याचीच स्टंटबाजी समोर आलीये. पण ही स्टंटबाजी स्वत:बरोबरच दुसऱ्यांच्या जीवालाही धोकादायक ठरणारी आहे. या अधिकाऱ्यानं चक्क आपल्या चिमुकल्या मुलाच्या हातात धावत्या कारची स्टेअरिंग दिली.. आणि याचा व्हिडिओही बनवला.
बोईसर जवळील मंडळ अधिकारी विजय गुंडकर यांनी त्यांच्या लहान मुलाच्या हातात कारचे स्टेअरिंग दिलं. अधिकारी विजय गुंडकर हे ड्रायव्हरच्या सीटवर बसले आहेत. गुंडकर यांच्या मांडीवर त्यांचा लहान मुलगा बसला आहे. तो चिमुकला स्टेअरिंग हातात घेऊन कार चालवतोय. या अधिकाऱ्याने स्वत:च हा व्हिडीओ व्हायरल केल्याचे समोर आलंय..
राज्यात स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई होत असताना एका सरकारी अधिकाऱ्यानं केलेल्या व्हिडीओची चर्चा होतेय.. खरतरं सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात ज्यामुळे रस्ता सुरक्षेचा मुद्दा नेहमी चर्चेत असतो. वाहन चालवताना एक चूक आपल्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे अशा महसूल अधिकारी निष्काळजी बापावर त्वरीत कारवाईची मागणी जोर धरतेय...कारण पालकांचा निष्कळाजीपणा मुलांचं आयुष्य पुर्णपणे बिघडवू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.