ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांना कोणत्याही गोष्टींची सवय पटकन लागते. परंतु कोणतीही सवय सोडवण्यासाठी आई- वडिलांना अनेक परिश्रम करावे लागतात.
बहुतांश २ वर्षाखालील मुलांना अंगठा चोखण्याची सवय लागते. आणि ही सवय लवकर सुटत नाही. मग ही सवय मुलं मोठी झाली तर सुटत नाही.
अंगठा चोखल्याने मुलांना शांती आणि आराम मिळतो. परंतु यामुळे त्यांच्या तोंडाचा आणि दातांचा विकास होत नाही.
सर्वप्रथम तर मुलांवर लक्ष ठेवा की ते किती वेळासाठी अंगठा चोखतात. आणि त्यांना होणाऱ्या नुकसान आणि परिणांमाबद्दल सांगा.
काही मुलं भूख लागल्यावर अंगठा चोखतात म्हणून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा आणि त्यांना वेळेवर जेवण द्या.
मुलांच्या अंगठ्यावर खाण्याचा कडू किंवा आंबट पदार्थ लावा. परंतु तो पदार्थ त्यांचा आरोग्यासाठी नुकसानदायक नसावे. खराब टेस्टमुळे मुलं ही सवय सोडतील.
मुलांना संत्री किंवा द्राक्ष सारखे फळे द्या. म्हणजे ते अंगठा चोखणार नाही.
मुलांना खेळण्यात व्यस्त ठेवा. जेणेकरुन ते अंगठा चोखणे विसरतील.