ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोरफडीच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई बी१२, कॅल्शियम,मॅग्नेशियम, झिंक आणि अमीनोअॅसिड सारखे पोषक तत्व असतात.
कोरफडीच्या ज्यूसमध्ये एंझाइम असतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि आम्लपित्ताची समस्या कमी होते. आणि पचनक्रिया सुरळीत राहते.
कोरफडीच्या ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॅालिसेकेराइड्स असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
कोरफडीचा ज्यूस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहते. आणि त्वचा चमकदार बनते.
कोरफडीच्या ज्यूसचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॅालिजम रेट सुधारतो. आणि वजन लवकर कमी होण्यास मदत करतात.
कोरफड हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्यास बल्ड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते.
कोरफडचे ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारी जेवण्याच्या ३० मिनिटे अगोदर प्यावे. यामुळे आरोग्याला भरपूर फायदे होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.