ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळी एक असं फळ आहे जे लहानापासून मोठ्यांपर्यत सगळ्यांनाच खायला आवडतं.
केळीमध्ये आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
केळीमध्ये आयरनची जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केळी खाल्यानंतर लगेच काही पदार्थ खाणं टाळा.
केळी खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नका. यामुळे अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारखी समस्या होऊ शकतात.
केळी खाल्ल्यानंतर दूध पिऊ नका. दोन्हीही गोष्टी पचनासाठी जड असल्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते.
केळीचे सेवन केल्यानंतर संत्री, मोसंबी आणि द्राक्ष सारख्या आंबट फळे खाऊ नका. अन्यथा पोटदुखीची समस्या होऊ शकते.
केळीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. जर केळी खाल्ल्यानंतर तुम्ही अजून गोड पदार्थ खाल्लं तर ब्लड शुगर वाढू शकते.
केळी आणि एवोकाडो दोघांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. म्हणून दोन्ही गोष्टी एकत्र खाऊ नये.