NAshik Saam
महाराष्ट्र

Nashik News: कंडोम, चाकू अन् ड्रग्ज; ८वीतल्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात काय-काय सापडलं? नाशकात खळबळ

Nashik School Row Students Involvement in Substance Abuse Raises Concerns: नाशिक जिल्ह्यात धक्कादायक प्रकार. आठवी-नववीतील विद्यार्थ्यांच्या दप्तरातून सापडले चाकू, कंडोम, अंमली पदार्थ.

Bhagyashree Kamble

शिक्षण म्हणजे शिक्षणाचं मंदिर. पण नाशिक जिल्ह्यातील एका शाळेतील प्रकाराने पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाला हादरवून टाकलं आहे. आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांच्या दप्तारात सापडलेल्या आक्षेपार्ह वस्तूंमुळे खळबळ उडाली आहे. शाळेतील मुख्याध्यापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली. त्यावेळी दप्तरातून काही धक्कादायक वस्तू सापडल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तू सापडले आहेत. शाळेतील मुख्याध्यापकांनी अचानक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी केली. त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरातून फायटर, सायकलची लोखंडी चेन, धारदार चाकू, लोखंडी कडे, कंडोमची पाकिटे आणि पत्यांचे कॅट. विशेषत: अंमली पदार्थही सापडले आहेत.

हे आक्षेपार्ह वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडल्यामुळे पालक आणि शिक्षकांना धक्काच बसला. शिक्षकांनी सांगितलं की, हे विद्यार्थी नशेच्या आहारी गेल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. काही जण शाळेतच अंमली पदार्थांचे सेवन करत होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे शाळा प्रशासन आणि पालक वर्ग चिंतेक असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या वागणुकीमध्ये बदल, वाईट संगत आणि सोशल मीडियामुळे होणारे प्रभाव यावर आता गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी शिक्षक आणि पालक वर्गाकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT