CCTV footage shows thieves stealing the entire SBI ATM in Satana. Saam tv
महाराष्ट्र

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Satana SBI ATM Machine Pulled Out Theft: सटाणा शहरातील यशवंतनगर परिसरात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे संपूर्ण एटीएम मशीन उचलून नेले, सुमारे २५.९९ लाख रुपये रोकड लंपास. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिस तपास सुरू.

Omkar Sonawane

सटाणा येथील यशवंतनगर परिसरातील SBI एटीएम चोरीस गेले; सुमारे २५.९९ लाख रुपये रोकड चोरी झाली.

चोरट्यांनी गॅस कटरने शटर आणि लोखंडी गेट फोडून एटीएम मशीन उचलून बोलेरो वाहनात बांधले.

घटना पहाटे ३ वाजता घडली; चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिस तपास करत आहेत.

एटीएम साक्री परिसरात टाकले गेले; त्यातील रोकड लंपास करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरालगतच्या यशवंतनगर परिसरात चोरट्यांनी थरारक पद्धतीने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे संपूर्ण एटीएम मशीनच उचलून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास उघडकीस आली. एटीएममध्ये तब्बल २५ लाख ९९ हजार ४०० रुपये रोकड असल्याचा प्राथमिक अंदाज असून या घटनेमुळे सटाणा शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चोरीस नेलेले एटीएम धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरात रस्त्याच्या कडेला टाकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले.

मशीन फोडून त्यातील लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास उघड्या डिक्की असलेल्या बोलेरो जीपमधून तीन चोरटे घटनास्थळी दाखल झाले. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम केंद्राचे शटर व लोखंडी गेट तोडून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर एटीएम मशीनला दोरखंड बांधून वाहनाच्या डिक्कीला जोडत जोरात खेचून संपूर्ण मशीनच वाहनात टाकले. अवघ्या अर्ध्या तासात चोरटे ताहाराबादच्या दिशेने पसार झाले.

​एटीएम खेचताना सुमारे १५ ते २० मिनिटे आपत्कालीन सायरन सुरू होता. मात्र, एवढी मोठी घटना घडत असतानाही परिसरातील कोणाच्याही लक्षात ही बाब न आल्यानं तो चर्चेचा विषय ठरलाय. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला असून, फुटेजचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. चोरीत वापरलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT