Election 2026: मतदानाचा हक्क बजावा! १५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, आताच पाहून घ्या

Maharashtra Corporation Election Voting: राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणआर आहे. या दिवशी महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी कुणाकुणाला सुट्टी असणार वाचा सविस्तर...
Election 2026: मतदानाचा हक्क बजावा! १५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, आताच पाहून घ्या
Maharashtra Corporation Election Votingx
Published On

Summary -

  • १५ जानेवारी २०२६ रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे

  • मतदानाच्या दिवशी राज्यभर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली

  • शाळा, सरकारी कार्यालये, बँका, खासगी कंपन्यांना सुट्टी असणार

  • अत्यावश्यक सेवांमध्ये २–३ तासांची सवलत देणे बंधनकारक

राज्यात सध्या २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने गुरूवारी म्हणजेच १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी कुणा-कुणाला सुट्टी असणार आहे हे आपण पाहणार आहोत...

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने १५ जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टी संदर्भातील स्वतंत्र अध्यादेश देखील काढले आहेत. महापालिका निवडणुका सुलभ करण्यासाठी आणि मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

Election 2026: मतदानाचा हक्क बजावा! १५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, आताच पाहून घ्या
BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

मुंबई महानगर पालिकाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगरातील जिल्ह्यांसह पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी १५ जानेवारीला शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजेच जिथे पूर्ण दिवस सुट्टी दिल्यास मोठे नुकसान होऊ शकते अशा ठिकाणी कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी न देता २ ते ३ तासांची विशेष सूट देणे बंधनकारक असणार आहे. जेणेकरून ते कामगार त्या वेळेत मतदान करू शकतील.

Election 2026: मतदानाचा हक्क बजावा! १५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, आताच पाहून घ्या
Maharashtra Election : महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, आतापर्यंत इतके कोटी जप्त, तर...

मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आणि खासगी कंपन्यांना सुट्टी असणार आहे. सार्वजनिक सुट्टी ही फक्त सरकारी कार्यालयांपुरती मर्यादित नसणार आहे. १५ जानेवारीला केंद्र आणि राज्य शासनाची सर्व कार्यलये, सार्वजनिक उपक्रम आणि निमशासकीय संस्थांना सुट्टी असेल. सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांना सुट्टी असेल. आयटी कंपन्या, शॉपिंग सेंटर, खासगी कंपन्या, मॉल्स, रिटेलर्स यांना देखील सुट्ट्या असतील. त्याचसोबत सर्व कारखाना, दुकाने, खाद्यगृहे, नाट्यगृहे, निवासी हॉटेल्स आणि औद्योगिक उपक्रम याठिकाणी देखील सुट्टी असेल.

Election 2026: मतदानाचा हक्क बजावा! १५ जानेवारीला कुणाकुणाला मिळणार सुट्टी, आताच पाहून घ्या
Election : २९ महापालिकेचा निवडणूक निकाल उशिराने लागणार? मोठी अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com