Nashik Saptashrungi accident  
महाराष्ट्र

नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार ३०० फूट दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Nashik Saptashrungi accident : नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावरून परत येताना कार ३०० फूट दरीत कोसळून एकाच कुटुंबातील ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओव्हरटेकदरम्यान नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला.

Namdeo Kumbhar

  • सप्तश्रृंगी गडावरून परत येताना कार ३०० फूट दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला

  • सर्व मृतक हे पिंपळगाव बसवंत येथील एकाच कुटुंबातील होते

  • ओव्हरटेक करताना कारचे नियंत्रण सुटल्याने संरक्षण कठडे तुटले

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी ५ लाखांची मदत जाहीर

Nashik Saptashrungi accident full details : नाशिकमधील सप्तश्रृंगी गडावरुन दर्शन घेऊन परत येताना भाविकांवर काळाने घाला घातला. कार ३०० फूट खोल दरीत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घाटात कार ओव्हरटेक करताना अपघात झाला. या कारमधील सर्व भाविक हे पिंपळगाव बसवंतचे रहिवासी आहेत. सप्तश्रृंगी गडाच्या गणपती पॉइंटजवळ रविवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना कार संरक्षण कठाडे तोडून कार ३०० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली अन् बचावकार्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत दुख व्यक्त केले.

भाविकांच्या वारसांना ५ लाखांची मदत -

नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे. या भाविकांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात, नाशिक येथे दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मला अत्यंत दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी

MH 15 BN 0555 या कारमधून भाविक सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना काळाने घाला घातला. ओव्हरटेक करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार कठडे तोडून थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. घाटातील गणपती पॉइंटजवळ ही घटना घडली. या अपघातातील सर्वजण हे पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते. किर्ती पटेल (वय 50), रशिला पटेल (वय 50), विठ्ठल पटेल (वय 65), लता पटेल (वय 60), पचन पटेल (वय 60), मनी बेन पटेल (वय 70) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दु:ख व्यक्त केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बाबा आढाव यांच्यावर होणार पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

Prem Chopra: ९० वर्षीय प्रेम चोप्रा यांना झाला 'हा' गंभीर आजार; जावई शर्मन जोशी म्हणाला, 'त्यांचावर उपचार…'

Shocking: आई-वडिलांनीच घेतला ३ महिन्यांच्या 'शिवांश'चा जीव, मृतदेह पुलाखाली फेकला; धक्कादायक कारण समोर

Phone Risks: उशीजवळ फोन ठेवून झोपणं घातक आहे का?

Winter Sleeping Mistake: थंडीत ब्लँकेटने तोंड झाकून झोपताय? होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT