नाशिक शहरात रिंग रोड
संपूर्ण शहराला प्रतक्षिणा घालणारा रिंग रोड
रिंग रोडमुळे नाशिक-तिरुपती अवघ्या १२ तासात
नाशिकमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अंतर्गत आणि बाहेरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. नाशिक शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करायला लागू नये, यासाठी हा प्रकल्प असणार आहे. आता नाशिक शहरातून जााख्या सर्व महामार्ग, नाशिक सोलापूर-अक्कलकोट महामार्ग या रिंग रोडला जोडला जाणार आहे.
नाशिकमधून आणि आजूबाजूच्या सर्व महामार्गांना जोडण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. यामुळे आता तुम्ही अवघ्या १२ तासात तिरुपतीला पोहचणार आहात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. यासाठी लाखो भाविकांची गर्दी होईल. त्यादृष्टीने हा रिंग रोड खूप महत्त्वाचा आहे. सध्या नाशिकमध्ये धार्मिक, औद्योगिक आणि पर्यटनाचे केंद्र असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या कुंभमेळ्यात पाच ते सात कोटी भाविक येणार असल्याचा अंदाज आहे.
कुंभमेळ्यच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात ७७.४० किलोमीटरचा रिंग रोड बांधला जाणार आहे. यामुळे वाढवण-नाशिक द्रुतगत महामार्ग आणि नाशिक-चेन्नई महामार्ग जोडला जाणार आहे. हा चारपदरी मार्ग असणार आहे. यामध्ये बोगदा दोन मोठे पूल आणि २५ लहान पुलांचा समावेश आहे.
नाशिकमधील हा रिंग रोड संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घालणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग, नाशिक- सोलापूर अक्कलकोट (Nashik Akkalkit Expressway) आणि नाशिक चेन्नई असे सर्व मार्ग जोडले जाणार आहे.
नाशिक ते तिरुपती फक्त १२ तासात
रिंग रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर तिरुपतीला अवघ्या १२ तासात जाता येणार आहे. नाशिक ते तिरुपती अंतर १३०० किलोमीटर आहे. नाशिक-सोलापूर-हैदराबाद- कुरनूल-कडप्पा-तिरुपती असा मार्ग असणार आहे. या प्रवासासाठी २० ते २२ तास लागतात. आता नाशिक ते अक्कलकोट अशा मार्गाला मंजुरी दिली आहे. यामुळे प्रवासाचे अंतर २०१ किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी ४५ टक्क्यांनी कमी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.