Nashik Police parade criminal rapper after shaving his head for glorifying crime on social media. saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime: गुन्हेगारी रॅपरची जिरवली; टक्कल करत काढली धिंड, कोयत्याची भाषा करणाऱ्याला चालताही येईना|Video Viral

Police Bald Parade Criminal Rapper: नाशिक पोलिसांनी गुन्ह्यांचे उदात्तीकरण करणाऱ्या रॅपरवर कडक कारवाई केली आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याचे मुंडण केले. त्यानंतर पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे.

Bharat Jadhav

  • सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रॅपरवर कारवाई.

  • पोलिसांनी रॅपरचं टक्कल करून त्याची धिंड काढली.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर पोलीस अॅक्शन मोड आले आहेत.

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

सोशल मीडियावर गुन्हेगारी रिल बनवून गु्न्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्यावरही नाशिक पोलिसांची कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावर ताईगिरी करणाऱ्या दोन तरुणींना खाक्या दाखवल्यानंतर आज पोलिसांनी गुन्हेगारी रॅप करणाऱ्याची जिरवली. आपल्या रॅपमधून गुन्हेगारांचा कौतुक करणाऱ्याला नाशिक पोलिसांनी कायदाचा इंगा दाखवला. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक शहरातील गुन्हेगारांना नायनाट करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. प्रत्येक दिवसाला गुन्हेगारांना अटक सत्र सुरू आहे. चौकाचौकात भाईगिरी,दादागिरी, दहशत माजवणारे कोयता गँग वाल्याचा हिशोब पोलीस जागच्या जागीच करत आहेत. शहरात गुन्हेगारी वाढल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्री हॅण्ड दिल्यानंतर पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड सुरू आहे. अटक होण्याच्या धाकाने अनेक गुन्हेगारांनी शहर सोडलंय. नाशिक पोलीस गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्याला धडा शिकवत आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका तरुणाने गुन्हेगारीवरील रॅप सॉन्ग रिल अपलोड केले होते. त्यानंतर पोलिसांनीया रॅपरवर कारवाई करत त्याचे टकक्ल करत बाजारातून धिंड काढली. कोयत्यानं खोपडी फोडण्याची भाषा करणाऱ्या रिल रॅपरला पोलिसांनी खाकीचा दम दाखवल्यानंतर रॅप सोडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचं म्हणू लागला. पोलिसांनी त्याची धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात गुन्हेगारी रॅप बनवणाऱ्याला साधं चालताही येत नव्हतं.

युवकावर प्राणघातक हल्ला

नाशिकच्या पंचवटीतील गजानन चौकातील कोमटी गल्लीत भरदिवसा दुचाकीहून आलेल्या संशयिताने एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. काही नागरिकांनी हल्लेखोराला हटकल्याने सुदैवाने हा युवक बचावला. काही नागरिकांनी मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केलं. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र संशयित फरार झाल्याने सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमध्ये चित्रित झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून दोघा हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय.

सोमवारी दुपारी एक युवक पळत गजानन चौकातील कोमटी गल्लीत आला. त्याचा पाठलाग करत दोघे संशयित दुचाकीहून आले, त्यांनी अक्षरशः या मार्गाहून जाणाऱ्या दोन मुली आणि स्कूल व्हॅनला धडक दिली आणि त्या पळणाऱ्या युवकाला रस्त्यातच गाठून दुचाकीहून उतरलेल्या एका संशयिताने धारदार शस्त्राने युवकाचा पोटावर वार केला. आणि त्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

Fact Check: तुमच्या कॉफीमध्ये झुरळाची पावडर, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT