Crime News : बापानेच लेकीचं कुंकू पुसलं, लग्नाच्या ३ महिन्यातच जावयाची केली हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Tamilnadu Crime News : तामिळनाडूमध्ये लग्नाला तीन महिने उलटून गेल्यावर सासरच्या मंडळींनी जावयाची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी सासऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
Crime News : बापानेच लेकीचं कुंकू पुसलं, लग्नाच्या ३ महिन्यातच जावयाची केली हत्या, धक्कादायक कारण आलं समोर
Tamilnadu Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • आंतरजातीय लग्नाच्या वादातून तामिळनाडूमध्ये तरुणाची निर्घृण हत्या.

  • सासऱ्याने धारदार शस्त्राने जावयावर वार करून हत्या केली

  • रामचंद्रन आणि आरती यांच्या लग्नाला तीन महिने झाले होते

  • पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

तामिळनाडूमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाला त्याच्या सासरच्या मंडळींनी लग्नाच्या ३ महिन्यानंतर त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे ही हत्या आंतरजातीय विवाहाच्या वादातून झाल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी तरुणाच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचं नाव रामचंद्रन असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यात एका गावात राहणारा रामचंद्रन हा दूध विक्रीचा व्यवसाय करायचा. यादरम्यान सोशल मीडियाद्वारे त्याची ओळख बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या आरतीशी झाली. सुरुवातीला या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. त्यानंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरती आणि रामचंद्रन दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते. या दोघांनीही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नाचा घाट घातला.

Crime News : बापानेच लेकीचं कुंकू पुसलं, लग्नाच्या ३ महिन्यातच जावयाची केली हत्या, धक्कादायक कारण आलं समोर
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाची चिन्हं! हवामान खात्याचा ११ जिल्ह्यांना इशारा

घरच्यांच्या मानविरोधात जाऊन लग्न केल्याने आरतीच्या कुटुंबियांच्या मनात राग खदखदत होता. या रागाच्या आहारी जाऊन आरतीच्या वडिलांनी दुचाकीवरून कुझीपट्टीला जाणाऱ्या रामचंद्रनला वाटेत अडवले. त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाली. आरतीच्या वडिलांच्या मनात असलेल्या रागात धारदार शास्त्राने रामचंद्रनच्या डोक्यावर, हातावर आणि पायांवर सपासप वार केले.

Crime News : बापानेच लेकीचं कुंकू पुसलं, लग्नाच्या ३ महिन्यातच जावयाची केली हत्या, धक्कादायक कारण आलं समोर
Crime News : खोटं कारण देऊन निर्जनस्थळी नेलं, १३ वर्षीय मुलीवर भावाने केले अत्याचार, २ मित्रांचाही हात

या हाणामारीत रामचंद्रन जागीच कोसळला. मात्र आरतीच्या वडिलांनी घटनास्थळावरुन पळ काढला. रामचंद्रन तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. नागरिकांनी हे बघताच स्थानिक पोलिसांना कळवले. तोपर्यंत रामचंद्रन याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रामचंद्रनचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. रामचंद्रनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निलकोट्टई सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पथके फरार असलेल्या चंद्रनचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com