Nashik Cyber Crime : डिजिटल अरेस्टची भीती; ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा

Nashik News : नाशिकमध्ये दोन घटना समोर आल्या असून एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाला ७२ लाख रुपयांना लुटले आहे. तर दुसऱ्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाचे तब्बल ६ कोटी रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार
Nashik Cyber Crime
Nashik Cyber CrimeSaam tv
Published On

नाशिक : सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. यात डिजिटल अरेस्टची भीती दाखवत गंडा घातला जात आहे. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या दोन घटना उघडकीस आल्या असून या डिजिटल अरेस्टच्या दोन्ही घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधी रुपयांमध्ये गंडविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. 

सायबर गुन्हेगार वेगवेगळे आमिष दाखवत फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. तसेच डिजिटल अरेस्टची भीती दाखवत पैसे उकडले जात आहे. नाशिकमध्ये दोन घटना समोर आल्या असून एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाला ७२ लाख रुपयांना लुटले आहे. तर दुसऱ्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाचे तब्बल ६ कोटी रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Nashik Cyber Crime
Buldhana Accident : केळीने भरलेला ट्रक पलटी; दोन मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर

सरन्यायाधीश गवईंच्या कोर्टात हजर राहण्याच्या बहाण्याने लुटले 

दरम्यान भारताचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाइन हजर करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांना फसवणूक करत कोट्यवधी रुपये लुटले आहेत. यात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे ७२ लाख रुपयांचा दंड भरला नाही, तर सीबीआयचे पथक अटक करेल अशी भीती दाखवून अशी दमबाजी करून ७४ वर्षीय वृद्धाला घातला ७२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. 

Nashik Cyber Crime
Nashik : नाशिकमध्ये १५ लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अश्लील फोटो व्हायरल झाल्याची भीती 

तर दुसऱ्या प्रकरणात सिमकार्डच्या माध्यमातून अश्लील फोटो व्हिडीओ व्हायरल झाल्याचे भासवून कोर्टात हजर करण्याची भीती दाखविण्यात आली. यात तब्बल ६ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. मात्र याचा अद्याप तपास लागलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com