Trimbakeshwar Temple Entry Row Saam tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar Temple Entry Row: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणात नवा ट्विस्ट; महंत अनिकेत शास्त्री महाराजांनी केला खळबळजनक दावा

महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी त्र्यंबकेश्वरमधील हजरत सय्यद गुलाब शाहावली मशीद हे नाथ संप्रदायातील मंदिर होते, असा खळबळजनक दावा केला आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik Trimbakeshwar temple News: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. याच प्रकरणात महंत अनिकेत शास्त्री महाराजांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. महंत अनिकेतशास्त्री महाराज यांनी त्र्यंबकेश्वरमधील हजरत सय्यद गुलाब शाहावली मशीद हे नाथ संप्रदायातील मंदिर होते, असा खळबळजनक दावा केला आहे. (Latest Marathi News)

त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जमावाने बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणावरुन आखाडा आक्रमक झाला आहे. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या प्रकरणात आता त्र्यंबकेश्वरच्या वेगवेगळ्या आखाड्यातील 12 साधू आणि महंतांची ही समिती नेमण्यात आली आहे. याचदरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील हजरत सय्यद गुलाब शाहावली मशीद हे नाथ संप्रदायातील मंदिर होते, असा दावा महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी केला आहे.

महंत अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले, 'त्र्यंबकेश्वरमधील मशीद ही नाथ संप्रदायातील मंदिर असून तिथं ३ भुयार आहेत. त्या भुयारामध्ये गणपती आणि देवता आहेत. तसंच तेथील मजारीवर नाथ संप्रदायातील चिन्हे अंकीत आहेत, असा दावा महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी केला आहे.

'केंद्र आणि राज्य सरकार, इतिहास तज्ञ आणि पुरातत्व विभागाने मस्जिदीचा सर्व्हे करावा आणि नाथ संप्रदाय मंदिर आमच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी केली आहे. अनिकेत शास्त्री महाराज यांच्या मागणीनंतर केंद्र आणि राज्य सरकार, इतिहास तज्ञ आणि पुरातत्व विभागाकडून काय उत्तर मिळणार, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेसेनेचे आमदार शिंदेंवर नाराज? राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

SCROLL FOR NEXT