Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : बेपत्ता तिन्ही मुलांचा लागला तपास; तलावाजवळ कपडे पाहून कुटुंब हादरले, शोधकार्य सुरु

Nashik News : तीनही मुले काल सकाळपासून बेपत्ता होती. यामुळे नातेवाईकांकडून काल दुपारपासून मुलांचा शोध सुरू होता. मात्र ते कुठेच आढळून आले नाही तलावाजवळ या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आले

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : नाशिकमध्ये काल साधारणपणे अकरा वाजेपासून तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. त्यांचा शोध घेतला असताना या बेपत्ता असलेल्या विडी कामगार नगरी येथील तीन मुलांचा शोध लागला असून पाटालगत असलेल्या एका कृत्रिम तलावात या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आले आहेत. यामुळे या तलावात मुले बुडाली असल्याची शक्यता वर्तविली जात असून त्यांचा शोध सुरु आहे.  

नाशिकच्या विडी कामगार नगर येथील साई गरड, साई उगले आणि साई मोहिते अशी बेपत्ता असलेल्या तीन मुलांची नावे आहेत. दरम्यान हि तीनही मुले काल सकाळपासून बेपत्ता होती. यामुळे नातेवाईकांकडून काल दुपारपासून मुलांचा शोध सुरू होता. मात्र ते कुठेच आढळून आले नाही. अखेर आज सकाळी पाटा लगत असलेला एका खाजगी बांधकामासाठी खोदलेला तलावाजवळ या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्यानं हे तीन मुलं याच तलावात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

तलावात शोध सुरु 

दरम्यान या घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस आणि नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलांकडून तीनही मुलांचा शोध सुरू आहे. पाटालगत एक खाजगी बांधकाम व्यवसायाने इमारत उभारणीच्या निमित्ताने मोठा खड्डा खणलेला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने हे तीनही मुलं काल दुपारी आंघोळीच्या निमित्ताने इथे आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरात सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले आहे. खाली गाळ असल्याने या गाळात फसून मुलांचा मृत्यू झाला असावा; असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गाळ असल्याने शोध घेण्यात अडचण 

घटनेमुळे पोलीस प्रशासन महापालिकेचे अग्निशामक दल आणि बिडी कामगार नगर येथील शेकडो नागरिकांनी मुलांना शोधण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मुलांचा शोध लागत नसल्याने मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी हंबरडा फोडला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही मुलांचे नाव साई आहे. एअरपोर्टच्या साह्याने मुलांचा शोध सुरू आहे. आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने मुलांचा शोध घेण्यात मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT