Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; घरातच थाटला होता कारखाना, तिघांना बेड्या

Ahilyanagar News : अहिल्यानगरच्या राहुरीत पोलिसांनी ६६ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. प्रिंटिंग व झेरॉक्स मशिनसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटांचा कारखाना घरात चालवला जात होता, असा पोलिसांचा खुलासा आहे.
Ahilyanagar Fake Currency
Ahilyanagarsaam tv
Published On

अहिल्यानगर जिल्ह्यातुन मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ६६ लाख बनावट नोटांसोबत प्रिंटिंग मशिन, झेरॉक्स मशिन व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या बनावट नोटांचा कारखाना घरात थाटला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना २८ जून रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, तीन अज्ञात व्यक्ती मोटार सायकलवरून नगरमधून राहुरीच्या दिशेने बनावट नोटा घेऊन निघाले आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राहुरी शहरातील नगर मनमाड रोडवरील एका महाविद्यालयासमोर सापळा रचला. या सापळ्यात प्रतीक पवार, राजेंद्र चौगुले, आणि तात्या विश्वनाथ हजारे या तिघांना अटक केली. त्यांची अंगझडती घेतल्यानंतर या तिघांकडे बनावट नोटा आढळून आल्या. खासगी बँकेच्या अधिकाऱ्यांनी ते तपासले असता त्या नोटा बनावट असल्याचं समोर आलं आहे.

Ahilyanagar Fake Currency
Ahilyanagar Tourism: अहिल्यानगरमध्ये वसलंय एक सुंदर हिल स्टेशन, एकदा तरी नक्की जा

आरोपींनी या नोटा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील समाधान गुरव यांच्या भाड्याच्या घरात तयार केल्या असल्याची कबुली दिली. आरोपींच्या कबुली जबाबावरून राहुरी पोलिसांनी टेंभुर्णी येथील आरोपींनी सांगितलेल्या राहत्या घरावर छापा टाकून बनावट नोटा तयार करणारे युनिट उघडकीस आणले. या युनिटमधून तब्बल ६६ लाख रुपयांच्या बनावट नोटा, तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारा विशेष कागद, प्रिंटिंग मशिन, झेरॉक्स मशिन व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. असा एकूण ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत बनावट नोटांचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे.

Ahilyanagar Fake Currency
Cloudburst in Ahilyanagar: नगरमध्ये ढगफुटी, तुडुंब भरलेल्या नदीत 5 जण अडकले; आपत्ती व्यवस्थापन पथकाने जिवाची बाजी लावून वाचवले, थरार कॅमेऱ्यात कैद|VIDEO

दरम्यान या तिघांना अटक करण्यात आली असून, ते अहिल्यानगर येथे हे बनावट नोटा कोणाला पुरवण्यासाठी आले होते, या बनावट नोटा कुठे-कुठे वापरण्यात आल्या, किती रक्कम आधीच चलनात आली आहे आणि अजून कोण कोण गुन्ह्यात सहभागी आहे, याचा सविस्तर तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com