नाशिक, ता. २५ सप्टेंबर
Sanjay Raut On Amit Shah Maharashtra Visit: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या या दौऱ्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मतदार संघांचा आढावा घ्यायला गृहमंत्री संरक्षण खात्याचे विमान घेऊन येतात हे मजेशीर वाटतंय, असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.
"देशाच्या गृहमंत्र्यांना सर्व कामे टाकून महाष्ट्रात येतात. मणिपूर उत्तर प्रदेश, लडाख, देशाची कायदा सुव्यवस्था, अतिरेकी प्रश्न वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रात तयारीचा आढावा घेण्यासाठी येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मणिपूर हिंसाचार, काश्मीर, लडाखमध्ये सैन्य घुसले त्याचा आढावा नाही, अरुणाचलला सैन्य घुसले त्याचा आढावा नाही. मात्र मतदार संघाचा आढावा घ्यायला संरक्षण खात्याचे विमान घेऊन येताय हे मजेशीर वाटतंय," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
तसेच "गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार, कलेक्टर यांना दम देणार, निवडणुकीत आमच्या बाजूने राहा सांगणार. गृहमंत्री येणार म्हणजे दबाव निर्माण करण्याचे काम करणार हा दहा वर्षाचा अनुभव आहे. लोकसभेत त्यांनी असे राष्ट्रीय कार्य केले म्हणून ते सत्तेवर आले आहे. मला चिंता वाटते कारण मोदी शाह येतात तेव्हा उद्योग बाहेर जातात, नाशिकच्या लोकांनी सावध राहावे," अशी कोपरखळीही राऊतांनी मारली.
"उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, असे विधान अमित शहांनी केले. यावरुनही संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. धोका कुणी कुणाला दिला हे महाराष्ट्र जाणतो. म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपचा हिशोब चुकता केला. स्वतः अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेला धोका दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र खोलीत चर्चा झाली, मात्र अमित शाह यांनी धोकेबाजी केली आणि त्याचा हिशोबही चुकता केला," असा घणाघात संजय राऊत यांनी लगावला.
दरम्यान, "उद्या (गुरुवार, ता. २६) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावरुनही राऊतांनी चांगलीच फटकेबाजी केली. महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्या हातून गेली आहे. हरियाणा आणि जम्मू त त्यांचा पराभव होतोय. महाराष्ट्रात जेव्हा हरतील तेव्हा मोदींना खुर्चीवरून उतरण्याची तयारी सुरू झालेली असेल," असे म्हणत पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरुनही राऊतांनी निशाणा साधला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.