Gautami Patil, Nashik,
Gautami Patil, Nashik,  saam tv
महाराष्ट्र

बेधुंद तू बेछूट मी... 36 Nakhrewali.., पत्रकारांना मारहाण करणारे पाच जण पाेलीसांच्या ताब्यात, Gautami Patil कार्यक्रमाचे आयाेजकही अडचणीत (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik News : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मंगळवारी झालेल्या नाशकातील पहिल्याच कार्यक्रमात (Gautami Patil Nashik Program) तुफान राडा झाला. यामध्ये तिच्या चाहत्यांकडून पत्रकारांना मारहाण झाली. या प्रकरणाची पाेलिसांनी गंभीर दखल घेत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच गाैतमीचा कार्यक्रम आयाेजित करणा-यांवर नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

नाशिक शहरात पहिल्यांदाच गौतमी पाटीलच्या नृत्याचा मंगळवारी कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. हा कार्यक्रम महिलांना पाहता यावा यासाठी तिकीट दरात ४० टक्के सवलत देण्यात आली हाेती. रुग्णवाहिका निधी संकलनासाठी या कार्यक्रमाचे आयाेजन केल्याची माहिती आयाेजकांकडून देण्यात आली हाेती.

चाहत्यांचा बाज निराळा

या कार्यक्रमात गाैतमीच्या काही चाहत्यांकडून हुल्लडबाजी सुरु झाली. त्यांना आवर घालण्यासाठी पत्रकार आणि पाेलिसांनी पुढाकार घेतला मात्र त्यांची हुल्लडबाजी सुरुच राहिली. अखेरीस पाेलिसांनी व्यासपीठावर जाऊन गाेंधळ घालणा-यांना समज दिली. परंतु तरीही गाेंधळ घालणारे चाहत्यांचा बाज निराळाच दिसला. त्यातून काहींनी पत्रकारांना मारहाण केली.

पाच जणांना पाेलीसांनी घेतलं ताब्यात

दरम्यान गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात धिंगाणा घालणाऱ्या आणि प्रसार माध्यमांच्या कॅमेरामन हल्ला करणाऱ्या पाच जणांना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे आयोजकांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri News : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, रत्नागिरीत 3 कोटींची रोकड जप्त.. | Marathi News

Sharad Pawar Health News: एक दिवसाच्या ब्रेकनंतर शरद पवार पुन्हा एकदा झंजावाती दौऱ्यासाठी सज्ज! मोठी Update समोर

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT