Onion Price Saam tv
महाराष्ट्र

Onion Price: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर! ५ राज्यातील निवडणुकांमुळे कांद्याचे भाव घसरले; बळीराजा हतलब

Nashik News: ५ राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राज्यांमध्ये २५ रुपये प्रति किलो दराने बफर स्टॉकमधील कांद्याची विक्री सुरू केली आहे.

अभिजीत सोनावणे

Onion Farmer News:

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. देशाच्या काही भागात कांद्याचे दर ८० ते ९० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. मात्र केंद्राने ५ राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राज्यांमध्ये २५ रुपये प्रति किलो दराने बफर स्टॉकमधील कांद्याची विक्री सुरू केली आहे. परिणामी नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात जवळपास १ हजार रुपयांपर्यंत घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कधी ग्राहकांच्या तर अनेकदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने पुन्हा एकदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारात कांद्याचे भाव वधारल्याने थोड फार नुकसान भरून निघेल, असं शेतकऱ्यांना वाटत होते.

मात्र केंद्राने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या ५ राज्यांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तेथील मतदारांना खुश करण्यासाठी तिथं २५ रुपये प्रतिकिलो दराने आपल्या बफर स्टॉकमधील कांदा विक्री सुरू केली आहे. परिणामी नाशिकमधील बाजार समितीत कांदा दरात १ हजार रुपयांनी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

बाजारात घटलेली आवक आणि मागणीत झालेली वाढ यामुळे मागील काही दिवसांपासून कांद्याच्या भावात तेजी पाहायला मिळत होती. बाजारात शेतकऱ्यांना कांद्याला ५० ते ६० रुपये किलो भाव मिळत होता. परिणामी याआधी अतिवृष्टी आणि दर नसल्याने मोठे नुकसान उत्पादक शेतकऱ्यांना सोसावे लागले.

हे नुकसान काहीसे भरून निघण्यास मदत होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र केंद्र सरकारचे कांद्याबाबतचे धरसोड धोरण उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT