मदरशात अनाथ मुलांना अमानुष मारहाण, धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Sindhudurg school incident: सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप असलेला व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. स्थानिक स्तरावर संताप व्यक्त होत असून प्रशासनाकडून चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sindhudurg school incident
Sindhudurg school incidentsaam tv
Published On

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये एका शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार व्हायरल व्हिडिओमुळे उघडकीस आलाय. ही घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वी घडल्याची माहिती आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक स्तरावर संताप व्यक्त केला जातोय. या व्हिडिओमध्ये एका शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांना लाकडी दांड्याने मारहाण केल्याचं दिसतंय.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडिओ सावंतवाडीतील एका मदरशातील असल्याचं म्हटलं जातंय. मारहाण झालेले दोन्ही विद्यार्थी अनाथ असल्याचं स्थानिक पातळीवर सांगण्यात येतंय. जात आहे. व्हिडिओमध्ये वर्गासारखी खोली असून शिक्षक विद्यार्थ्यांना काठीने मारताना दिसत असल्याचा आरोप करण्यात येतेय.

Sindhudurg school incident
Viral Video: लग्नातील बुफे सोडून मॅगीवर तुटून पडले पाहुणे; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. व्हिडिओची सत्यता, घटना घडलेली तारीख आणि संबंधित व्यक्तींची ओळख याची पडताळणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाऊ शकते.

Sindhudurg school incident
Viral Video: मोपा विमानतळावर रानगव्याची एन्ट्री, कर्मचाऱ्यांसह प्रवासी घाबरून पळू लागले; VIDEO व्हायरल

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही नागरिकांनी विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेबाबत कठोर कारवाईची मागणी केली, तर काहींनी घटनेची सत्यता तपासूनच निष्कर्ष काढण्याचं आवाहन केलं.

Sindhudurg school incident
Viral Video: लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! स्टेजजवळ जात तरुणाने नवरीला गोळी झाडली, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

विद्यार्थ्यांवर अशा शारीरिक शिक्षेचे प्रकार रोखण्यासाठी कडक नियम असूनही अशा घटना अधूनमधून समोर येतात. बालकांच्या मानसिक आणि शारीरिक सुरक्षिततेसाठी शाळांनी शिस्तीचे धोरण अवलंबणं आवश्यक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com