Onion Price: कांद्याच्या दरात ७२५ रुपयांची घसरण; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तोटा

Manmad News : कांद्याच्या दरात ७२५ रुपयांची घसरण; कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तोटा
Onion Price
Onion PriceSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : कांद्याचे दर चांगल्या प्रकारे वाढले होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. (Onion) कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने बाजार समितीत देखील आवक वाढली होती. मात्र मागील पाच दिवसात कांद्याच्या दारात सरासरी ७२५ रुपयांची घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. (Breaking Marathi News

Onion Price
Buldhana Crime News : आईच्या उपचारासाठी बँकेतून काढलेले ५० हजार लांबविले; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

पुढील आठवड्यापासून लासलगावसह नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बाजार समिती दिवाळीनिमित्त बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वच बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) कांद्याचे आवकमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने कांद्याच्या किमान निर्यात मूल्य दरात ८०० डॉलर प्रति टन दराने वाढ केली. तसेच नाफेड, एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेल्या कांद्याच्या बफर स्टॉकमधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा किरकोळ बाजार २५ रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने परिणाम झाला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Onion Price
Electric Shock: दिवाळीची साफसफाई करताना ओढवला मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश

दर ४ हजारांपर्यंत खाली 

मागील पाच दिवसात कांद्याच्या सरासरी दरात टप्प्याटप्प्याने ८०० ते ९०० रुपयांची घसरण होत कांद्याची दर ४ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. लासलगावसह नाशिकच्या सर्वच बाजार समितीत दररोज एक लाख क्विंटलची कांद्याची आवक होत असून पाच दिवसात पाच लाख क्विंटल मागे कांदा उत्पादक (Farmer) शेतकऱ्यांना ३५ ते ४० कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com