Electric Shock: दिवाळीची साफसफाई करताना ओढवला मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश

Jalgaon News : दिवाळीची साफसफाई करताना ओढवला मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
Electric Shock
Electric ShockSaam tv
Published On

जळगाव : दिवाळी येत असल्याने सर्वत्र साफसफाईचे काम सुरु आहे. अशात व्यापारी वर्ग देखील (Jalgaon) मजूर लावून सफाईचे काम करत आहे. अशाच एका फटाका विक्रेत्याने घराची साफसफाई करण्यासाठी पाठवलेल्या बालमजुराचा शॉक (Electric Shock) लागून मृत्यू झाला आहे. काम करत असताना उघड्या विद्युत तारेवर पाय पडून जागीच मृत्यू झाला. (Tajya Batmya)

Electric Shock
Bribe Trap: कार्यकारी अभियंत्‍याला रंगेहाथ पकडले; ठेकेदाराकडून मागितली होती 43 लाखाची लाच

सुनील संजय चव्हाण (वय १६) असे मयताचे नाव आहे. काहींनी मजूर लावून घर-दुकानांची साफसफाई सुरू केली आहे. साफसफाई करताना निष्काळजीमुळे एका अल्पवयीन बालकाच्या जिवावर बेतल्याची घटना जळगाव शहरातील गणेश कॉलनीत घडली. मन्यारखेडा-भुसावळ येथील रहिवासी सुनील चव्हाण हा शहरातील बोहरा (Diwali Festival) गल्लीत बांधकामाच्या ठिकाणी आई- वडील व बहीण यांच्यासोबत वास्तव्याला आहे. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करत असल्याने सुनील हा मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Electric Shock
Buldhana Crime News : आईच्या उपचारासाठी बँकेतून काढलेले ५० हजार लांबविले; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

बोहरा बाजारात असलेल्या फटाके दुकानाचे मालक अनिल अग्रवाल यांनी सुनील आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे अशा दोघांना त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी पाठवले. बुधवारी (१ नोव्हेम्बर) सकाळी सुनील आणि सागर हे देाघेही अग्रवाल यांच्या घरी सफाई करत होते. यावेळी सुनीलचा पाय खाली पडलेल्या विद्युत तारेवर पडला. तर उघडी असल्याने सुनीलला जोरदार झटका लागून तो जागेवर कोसळला. त्याला (Jalgaon Medical Collage) जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. सुनीलचे आई-वडील लहान बहिणीला घटनेची माहिती कळताच, ते रुग्णालयात धावत आले. मुलाचा मृत्यू झाल्याचे ऐकताच परिवाराने आक्रोश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com