Nashik Police Saam tv
महाराष्ट्र

Nylon Manja : नाशिकमध्ये ८० हजारांचा नायलॉन मांजा जप्त; यापुढे थेट हद्दपारीचा इशारा

Nashik News : मकरसंक्रातीचा सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील आता मकरसंक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. अर्थात आतापासूनच बाजारात विविध प्रकारच्या पतंग व मांजा विक्रीसाठी दाखल झाला आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : पुढील महिन्यात मकरसंक्रांत असल्याने आतापासून पतंग व यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा बाजारात विक्रीस आला आहे. बंदी असताना देखील नायलॉन मांजा विक्री होत आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाशिकच्या जेल रोड भागामधून सापळा रचत मांजा विक्री करताना ताब्यात घेतले. तर त्यांच्याकडून ८० हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. 

मकरसंक्रातीचा सण महिनाभरावर येऊन ठेपला आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील आता मकरसंक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जातात. अर्थात आतापासूनच बाजारात विविध प्रकारच्या पतंग व मांजा विक्रीसाठी दाखल झाला आहे. दरम्यान पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा हा घातक ठरत असल्याने या मांजामुळे अनेकजण जखमी तर काही जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे मांजा विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 

नाशिकमध्ये कारवाई 

उपनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध शाखेला जेलरोड सैलानी बाबा चौकाजवळ नायलॉन मांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जेलरोड परिसरात सापळा रचला होता. यानंतर मांजा विक्रीसाठी आणला असताना नाशिक पोलिसांनी याठिकाणाहून सुमारे ८० हजारांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. यंदाची नाशिकमध्ये हि पहिलीच कारवाई आहे. 

तीन जणांना घेतले ताब्यात 

दरम्यान उपनगर पोलिसांनी नायलॉन मांज्याचे १५१ गट्टू जप्त केले असून तीन संशतीतांना अटक करण्यात आली आहे. तसेच हि पहिली कारवाई असून नायलॉन मांज्या प्रकरणी दुसऱ्यांदा कारवाई झाली तर हद्दपारीचे आदेश काढले जाणार असल्याचे कठोर इशारा नाशिक पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांना दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतात मोठं काही तरी घडणार? सरकारकडून बँकांना 'लॉकडाऊन सारखे' आदेश

Onion Farmers Protest: कांद्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; कांदा उत्पादकांना हवा अडीच-3 हजारांचा दर

हौसेला नाही मोल! कोल्हापुरात जावयासाठी बनवली दीड किलो वजनी चांदीची चप्पल

Kakdiche Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवाय? मग हे काकडीचं सॅंडविच ठरेल बेस्ट

DA Hike: मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्त्यात वाढ

SCROLL FOR NEXT