Nashik Shivsena Nilesh Kokane  Saam TV
महाराष्ट्र

आधी शिवसैनिकावर फेकली काळी शाई, नंतर केला जीवघेणा हल्ला; नाशिकमधील भयंकर घटना

हल्ला कुणी आणि का केला याचा तपास भद्रकाली पोलिसांनी सुरु केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : एकनाथ शिंदे यांच्यासह गटाने शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये बॅनर लावण्यात आले होते. बॅनरवरील शिंदेंच्या फोटोवर काळे फासून आंदोलन करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी निलेश बाळा कोकणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सोमवारी रात्री हल्ला करुन जखमी केले. विशेष बाब म्हणजे हल्लेखोरांनी कोकणे यांच्यावर यावेळी अंगावर काळी शाही देखील फेकली. त्यामुळे या घटनेला त्या आंदोलनाशी जोडले जात आहे. (Nashik Latest News)

शिवसेनेचे शहर पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या अंगावर सोमवारी रात्री हल्लेखोरांनी काळी शाही फेकून हत्याराने हल्ला करत त्यांना जखमी केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून हा हल्ला कुणी आणि का केला याचा तपास भद्रकाली पोलिसांनी सुरु केला आहे.

सोमवारी रात्री साडे दहा ते पावणे अकरा वाजेच्या सुमारास कोकणे हे दुचाकीने एमजी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळून जात होते. यावेळी दोन दुचाकींवरुन आलेल्या सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून धारधार वस्तूने हल्ला केला. याचवेळी कोकणे यांच्या अंगावर काळी शाही फेकण्यात आली. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने ते घाबरून गेले. (Nashik Shivsena Latest News)

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तातडीने कोकणे यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह पोलीस ठाण्यांचे गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली. अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde : झाडं आमचे आई-बाप, त्यांच्यावर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंने संतापले

महिला शिक्षकाची वाट अडवली; दोघांनी मिळून कपाळावर गोळी झाडली, भरदिवसा रक्तरंजित थरार

Nitesh Rane: तपोवनातल्या वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? राणेंचा सवाल, शिरसट म्हणाले...

मुंबई-गोवा महामार्गाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? नव्या डेडलाइनची घोषणा

Paneer Roll: मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक पनीर रोल; सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT