Nashik News Saam Tv Marathi
महाराष्ट्र

Nashik: सॉरी आई-बाबा..., हातावर सुसाईड नोट लिहित दिव्यांग विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य

Nashik disabled student end life: नाशिकमध्ये दिव्यांग विद्यार्थिनीने आत्महत्या केली. हातावर सुसाईड नोट लिहित संपवलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस तपास करत आहेत.

Priya More

Summary:

  • नाशिकमध्ये दिव्यांग विद्यार्थिनीची आत्महत्या

  • राहत्या घरात घेतला गळफास

  • आई-वडिलांसाठी लिहिली शेवटचा मेसेस

  • हातावर लिहिली होती सुसाईड नोट

महाराष्ट्रातील नाशिकमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय दिव्यांग विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या विद्यार्थिनीने गळफास घेत आयु्ष्य संपवलं. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही. पण आत्महत्येपूर्वी तिने हातावर सुसाईड नोट लिहील होती. यामध्ये तिने आई-वडिलांची माफी मागितली आहे. नाशिक पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षा त्रिभुवन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव होते. दीक्षा जन्मताच अपंग होती. तिचा स्वभाव खूप शांत आणि मैत्रीपूर्ण होता. ती नाशिक शहरातील दिव्यांगांच्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दीक्षाने राहत्या घरात आयुष्य संपवलं. तिने रविवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

मुलीला फॅनला लटकलेले पाहून कुटुंबीय प्रचंड घाबरले. त्यांनी तात्काळ तिला खाली उतरवत रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी दीक्षाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांनीतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. शवविच्छेदनासाठी दीक्षाचा मृतदेह दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आला. दीक्षाच्या तळहातावर 'सॉरी, आय लव्ह यू, आई, बाबा' असे लिहिले होते.

मुलीचा हा शेवटचा मेसेज पाहून तिच्या कुटुंबींयाना रडू आवरेना. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचे एक पथक आत्महत्येचे कारण शोधत आहे. दीक्षाने आत्महत्या का केली? यामागचे कारण तिच्या कुटुंबीयांना अद्याप समजू शकले नाही. पोलिस यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT