Clash In Yevla Bazaar Committee, Nashik Over Onion Auction; Heavy Police Presence At The Scene Saam Digital
महाराष्ट्र

Nashik Onion News: कांदा लिलावावरून येवला बाजार समितीत हाणामारी; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, पाहा Video

Onion Auction | Nashik Yevla Bazar Samiti News in Marathi: नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हमाल-मापारी यांनी बंद पुकारलेला आहे. मात्र येवला बाजार समितीच्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी खासगी जागेत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. यावरून हाणामारी झाली आहे.

Sandeep Gawade

Onion Auction News

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हमाल-मापारी यांनी बंद पुकारलेला आहे. मात्र येवला बाजार समितीच्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी खासगी जागेत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असताना बाजार समिती बाहेर सुरू असलेल्या लिलावाला हमाल-मापारी यांनी विरोध केला, यातून बाजारसमितीत जोरदार हाणामारी झाली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिस कुमक मागवण्यात आली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

या संदर्भात बातमी करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना जमावातील काहींनी धक्काबुक्की केल्याची माहिती आहे. ही घटना पोलिसांना समजताच पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल होत त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत जमावाला शांत केलं. मात्र वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना, छायाचित्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीचा सर्वच स्थरातून निषेध व्यक्त होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल व मापारी यांच्यासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारा कर (लेव्ही) कपात करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ‘लेव्ही’ संदर्भात तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यापारी, बाजार समित्यांचे सभापती व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती, मात्र व्यापाऱ्यांनी बैठकीत गोंधळ घातल्याने कुठलाही तोडगा निघाला नाही.

 या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत प्रचलित पद्धतीने लिलाव सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्या व उपबाजार आवारामध्ये गेल्या आठ दिवसांपासून शेतमाल लिलाव ठप्प होते. लिलाव सुरू व्हावेत, यासाठी जिल्हाधिकारी शर्मा यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता.८) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर आज नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी खासगी जागेत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT