Vishal Patil: विशाल पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक, मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा केला ठराव

Sangli Loksabha Election 2024: विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागेवरून पुनवर्वाचार करावा अशी मागणी केली होती. पण तरी देखील अद्याप याबाबत काहीच निर्णय झाला नाही.
Congress Party Workers Aggressive
Congress Party Workers AggressiveSaam Tv

विजय पाटील, सांगली

सांगली लोकसभा मतदार संघातून (Sangli Lok Sabha Constituency) विशाल पाटील (Vishal Patil) यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याआधी विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागेवरून पुनवर्वाचार करावा अशी मागणी केली होती. पण तरी देखील अद्याप याबाबत काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे आता काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व तालुक्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकारी घेण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Congress Party Workers Aggressive
Prakash Ambedkar : भाजपसोबत महाविकास आघाडीनं 20 जागा फिक्स केल्या; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना देखील माहाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेस हायकमांडला या जागेचा पुनर्विचार करावा अशी विनंती केली होती. शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून काँग्रसने सुरूवातीपासून विरोध केला होता. पण कोल्हापूरची जागा काँग्रेससला सुटल्यामुळे सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा केला. त्यानंतर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता याच मुद्द्यावरून सांगलीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Congress Party Workers Aggressive
Sharad Pawar Video: सरळ आहे तो पर्यंत सरळ, कोणी वाकडे पाऊल टाकले तर..., शरद पवारांच्या जाहीर सभेचा टीझर आऊट

दरम्यान, शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. अशामध्ये या मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केल्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Congress Party Workers Aggressive
Madha Loksabha: माढ्यातून पूर्वी शरद पवार लढल्यामुळेच.. ; रणजितसिंह निंबाळकर पहिल्यांदाच बोलले!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com