Madha Loksabha: माढ्यातून पूर्वी शरद पवार लढल्यामुळेच.. ; रणजितसिंह निंबाळकर पहिल्यांदाच बोलले!

Madha Loksabha Constituency: पुर्वी संघर्ष झाल्यामुळे एका क्षणात दूर होत नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ही नाराजी दूर करतील, अशी अपेक्षा आहे," असे रणजितसिंह निंबाळकर यावेळी म्हणाले.
Ranjitsinh Nimbalkar On Sharad Pawar
Ranjitsinh Nimbalkar On Sharad PawarSaam Tv
Published On

पराग ढोबळे, नागपूर :

Ranjitsinh Naik Nimbalkar News:

माढ्यामध्ये अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाने भाजपविरोधात अखेर बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिते पाटील यांच्यासोबतच रामराजे नाईक निंबाळकरांनीही रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात काम करण्याचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडींमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे. यावर पहिल्यांदाच माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रणजितसिंह नाईक निंबाळकर?

"प्रत्येक मतदारसंघात अडचणी असतात. याआधी प्रत्येक निवडणूक ही राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो आहोत. नगरपालिकेपासून विधानसभेच्या निवडणुका विरोधात लढलो आहोत. त्यामुळे त्याठिकाणी नाराजी टप्प्याटप्प्याने दूर करण्याचा प्रयत्न होता. मात्र माढा हा पुर्वी शरद पवारांनी लढवल्यामुळे त्याठिकाणी राष्ट्रवादीची आक्रमकता जास्त असते. पुर्वी संघर्ष झाल्यामुळे एका क्षणात दूर होत नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ही नाराजी दूर करतील, अशी अपेक्षा आहे," असे रणजितसिंह निंबाळकर यावेळी म्हणाले.

तसेच "कोणीतरी विरोधात उभे राहते. ही निवडणूक माढ्यापुरती मर्यादित नाही, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. देशाची प्रगती ठरवणारी निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींचे धोरण राबवण्यासाठी ही निवडणूक लढत आहे. सर्वांना युतीधर्म पाळावा," असेही रणजितसिंह निंबाळकर म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ranjitsinh Nimbalkar On Sharad Pawar
Madha Loksabha: माढ्यातून विरोध कराल तर बारामतीत... पवारांच्या खेळीने महायुतीत मिठाचा खडा; निंबाळकर तातडीने फडणवीसांच्या भेटीला

दरम्यान, माढ्यामध्ये राजकीय हालचाली वाढल्या असून माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि दौंडचे आमदार राहुल कूल हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी तातडीने नागपूरमध्ये दाखल झाले. या भेटीमध्ये माढ्यातील रणनितीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Loksabha Election)

Ranjitsinh Nimbalkar On Sharad Pawar
Kalyan Crime News : पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षाची चोरी; नंबर बदलल्याने अडकला पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com