अभिजित देशमुख
कल्याण : भाड्याने रिक्षा चालवून कुटुंबाच्या उदरनिर्वाह होत नाही. पोटाची खळगी भरून कुटुंबाचा उदरनिर्वाह (Kalyan) करण्यासाठी रिक्षा चालकाने एक नव्हे तर दोन रिक्षा चोरल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. रिक्षावरील चुकीच्या नंबरवरून हा प्रकार समोर आला असून कल्याण क्राईम ब्रँचने त्याला ताब्यात घेतले आहे. (Tajya Batmya)
कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याला एका व्यक्तीने फोन करुन एक रिक्षा चालक कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या रुणवाल गार्डन समोर भाडे घेण्यासाठी उभे आहे. त्याचा रिक्षा नंबर चुकीचा आहे. त्याने ही रिक्षा चोरली असल्याची माहिती दिली. (Kalyan Crime News) क्राईम ब्रांचचे (Police) पोलिस कर्मचारी गुरुनाथ जरक आणि मिथून राठोड हे दोघे मिळालेल्या माहितीनुसार त्या जागेवर पोहचले. त्याठिकाणी रिक्षा उभी होती. रिक्षा चालकाला नाव विचारले. त्याने त्याचे नाव बबलू पवार असे सांगितले. त्याच्याकडे रिक्षाचे कागदपत्र दाखविण्याचे सांगितले. तेव्हा त्याच्याकडे रिक्षाचे कागदपत्रे नव्हती. यामुळे पोलिसांनी बबलू पवारला ताब्यात घेतले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांनी कसून चौकशी केली असता रिक्षा कळव्यातून चोरी (Theft) केल्याची कबुली दिली. इतकेच नाही तर या आधी देखील एक रिक्षा चोरी केली होती. ती रिक्षा खराब झाली. पत्नी, मुले असून पॉट भरण्यासाठी रिक्षा भाड्यावर घेऊन दररोज त्याला भाडे द्यावे लागत होते. मला काही पैसे वाचत नव्हते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत होतो. म्हणून मी रिक्षा चोरीचा पर्याय निवडल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण क्राईम ब्रांच पोलिस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.