सुशील थोरात
अहमदनगर : उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची समस्या बिकट बनली आहे. पिकांना पाणी देणे देखील कठीण झाले आहे. यात (Ahmednagar) अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. अशा परिस्थिती शेतात लागवड केलेला टोमॅटो तीव्र उन्हामुळे करपून जात आहे. (Latest Marathi News)
अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. दक्षिण नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुके हे दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यातच कडक उन्हाळ्यामुळे हातचे पिके वाया जाताना दिसत आहेत. मांजरसुंबा येथील बाबासाहेब कदम यांच्या ३० गुंठे (Tomato) टोमॅटोचा फड उन्हामुळे करपून गेला आहे. यामुळे मोठे नुकसान या (Farmer) शेतकऱ्याचे झाले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -
खर्च निघणे कठीण
३० गुंठे टोमॅटोचा फडासाठी ५५ हजार रुपये खर्च झाला. बाजारात चार ते पाच रुपये किलो प्रमाणे टोमॅटो जात असल्याने त्यांना मजुरी खर्च देखील मिळत नसल्याने त्या चिंतेत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व नेते प्रचारात व्यस्त आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी उमेदवारांना वेळच नाही; असेच काहीशी परिस्थिती पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याचे देखील झाले आहे. त्यामुळे शासन प्रशासन याकडे लक्ष द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.