Madha Loksabha: माढ्यातून विरोध कराल तर बारामतीत... पवारांच्या खेळीने महायुतीत मिठाचा खडा; निंबाळकर तातडीने फडणवीसांच्या भेटीला

Maharashtra Politics: माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि दौंडचे आमदार राहुल कूल हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी तातडीने नागपूरला रवाना झाले आहेत.
Maharashtra Politics:
Maharashtra Politics: Saamtv
Published On

Madha Loksabha News:

माढ्यामध्ये अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाने भाजपविरोधात अखेर बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर फलटणचे रामराजे नाईक निंबाळकरही रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात काम करणार असल्याचे बोलले जात आहे. शरद पवारांच्या या खेळीने भाजपच्या गोटात हालचाली वाढल्या असून माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण- खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि दौंडचे आमदार राहुल कूल हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी तातडीने नागपूरला रवाना झाले हेत.

माढा लोकसभा मतदार संघात रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम न करण्याची भूमिका घेतली आहे. एकीकडे मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील विरोधानंतर फलटणमध्येही रणजितसिंह निंबाळकर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, राहुल कूल हे खास विमानाने नागपूरकडे रवाना झाले आहेत.

नागपूरमध्ये ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेवुन माढ्याच्या विषयावर चर्चा करुन १६ तारखेला फाॅर्म भरण्याची वेळही घेणार आहेत करणार आहे. त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह निंबाळकरांविरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीकडून युतीधर्म पाळला जात नसल्याबद्दल तक्रारही करणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics:
Nashik Crime News : मालेगाव पोलिसांची मोठी कामगिरी, नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यास सूरतमधून अटक

माढ्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) विरोधात काम करणार असतील तर दौंडमधून बारामतीला मदत नाही, अशी आक्रमक भूमिकाही भाजप आमदार राहुल कुल यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीत काय चर्चा होणार? निंबाळकराचे बंड शमणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

Maharashtra Politics:
Akola Politics: १० वर्षांत काय केलं? मतदान का करायचं? ग्रामस्थांनी भाजप उमेदवाराला विचारला जाब

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com