Akola Politics: १० वर्षांत काय केलं? मतदान का करायचं? ग्रामस्थांनी भाजप उमेदवाराला विचारला जाब

Akola Political latest news : लोकसभा निवडणुकीचे उमेदवार लोकांच्या घरी जाऊन मतदानासाठी विनवणी करताना दिसत आहे. मात्र, काही उमदेवारांना मतदारांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार अकोल्यातून समोर आला आहे.
Akola Politics:
Akola Politics: Saam tv

मनोज जयस्वाल, वाशिम

akola bjp candidate viral video :

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षाचे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीचे उमेदवार लोकांच्या घरी जाऊन मतदानासाठी विनवणी करताना दिसत आहे. मात्र, काही उमदेवारांना मतदारांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. असाच प्रकार अकोला लोकसभा मतदारसंघातून समोर आला आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपने अनुप धोत्रे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनुप धोत्रे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अनुप धोत्रे यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी तेथील लोकांच्या भेटी घेतल्या. यावेळी मतदारांनी अनुप धोत्रे यांना चांगलाच जाब विचारला.

Akola Politics:
Jayant Patil News: हातकणंगलेत जयंत पाटलांचा नवा डाव.. थेट शिंदे समर्थक आमदाराची घेतली भेट; धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढणार?

अकोल्यातील लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे मतदार संघात फारसे दिसून न आल्याने त्याचे पुत्र व भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रचार करत आहेत. यावेळी त्यांना अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Akola Politics:
Kolhapur Election : कोल्हापुरातील कॉलेजमध्ये लोकसभा उमेदवाराचा प्रचार; प्राचार्यांना भाजप कार्यकर्त्यांनी धरलं धारेवर

मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे अनुप धोत्रे प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना नागरिकांनी दहा वर्षांत काय केले? तुमचे वडील खासदार असताना आमचे गाव दिसले नाही का? आता तुम्ही निधी दिल्याचे सांगता... त्यामुळे तुम्हाला आम्ही मतदान का करावे? असा जाब ग्रामस्थ विचारू लागले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com