Bribe Case  Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : शाळा प्रवेशासाठी लाच; मुख्याध्यापकासह शिक्षक ताब्यात

Nashik News : नाशिकच्या सातपूरमधील श्रमिक नगरच्या शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय आहे. बिहार राज्यातील तक्रारदार हे हिंदी भाषिक असून हिंदी स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी यांची दोन्ही मुले प्रयत्न करत होती

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : सध्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार नाशिक (Nashik) शहरात शाळा प्रवेशासाठी लाच (Bribe) घेण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मुख्याध्यापक आणि शिक्षकास अटक करण्यात आली आहे. यामुळे शाळा व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या सातपूरमधील श्रमिक नगरच्या शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय आहे. बिहार राज्यातील तक्रारदार हे हिंदी भाषिक असून हिंदी स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी यांची दोन्ही मुले प्रयत्न करत होती. त्यानुसार तक्रारदार हे शामलाल गुप्ता माध्यमिक शाळेत (School) हिंदी भाषिक मुलांना इयत्ता सातवीच्या वर्गात प्रवेश देण्या या वेळी त्यांच्याकडून प्रवेशाच्या च्या मोबदल्यात पालकांकडून १० हजार रुपयांचा इमारत निधी मागण्यात आला होता. 

इमारत निधी घ्यायचा पण त्यासाठी पावती न देता ही रक्कम स्वीकारण्यात आल्याने लाचखोर ५६ वर्षीय मुख्याध्यापक सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा व (Teacher) उपशिक्षक दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे यांना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कामगार असलेल्या या व्यक्तीच्या मुलांना प्रवेश देण्यासाठी होणारी आर्थिक पिळवणूक या निमित्ताने समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेना आमनेसामने; पराभवावरून आमदारानं डिवचलं

Vetoba temple Konkan: भक्तांच्या हाकेला धावणारा देव वेतोबा; कोकणात कुठे आहे याचं मंदिर?

Crime News: बेडरूममध्ये पत्नीचे दोन परपुरुषांसोबत भलतेच चाळे सुरू, तेवढ्यात पती आला अन्...; जे घडलं त्यानं गाव हादरलं

Red Saree Contrast Blouse: लाल साडी नेसणं टाळताय? मग 'हे' कॉन्ट्रास्ट ब्लाउज करा ट्राय, तुम्हीच दिसाल उठून

Maharashtra Live News Update: अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आंबेडकरवादी समाज रस्त्यावर.

SCROLL FOR NEXT